सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाची मोठी मेजवानी आहे. 'धडक २' पासून ते मोहनलाल यांच्या 'हृदयपूर्वम' पर्यंत, तब्बल २५ चित्रपट आणि वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 

सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा चित्रपट आणि ओटीटी प्रेमींसाठी आनंदाचा असणार आहे. साऊथ ते बॉलिवूडपर्यंत अनेक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या सेवेत दाखल होणार आहेत. वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट येणार असून नवरात्रीच्या सुट्यांमध्ये आपण त्याचा आनंद घेऊ शकता. तब्बल २५ चित्रपट आणि वेबसिरीज रिलीज होणार असून प्रेक्षक त्याचा आनंद घेऊ शकणार आहेत.

धडक २ नेटफ्लिक्सवर येणार 

धडक २ हा सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला दाखल होणार आहे. २६ सपटंबर रोजी नेटफ्लिक्सवर हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. जनावर या वेबसिरीजची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती. ती वेबसिरीज सर्वांच्या भेटीला लवकरच येणार आहे. २६ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला ही सिरीज येणार आहे.

दादासाहेब फाळके पुरस्कारप्राप्त अभिनेते मोहनलाल यांचा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हृदयपूर्वम हा चित्रपट २६ सप्टेंबरला जिओ हॉटस्टार हा प्लॅटफॉर्मवर येत आहे. तो सिनेमा २८ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता आणि त्याला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद भेटला होता. दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील 'सुंदरकांड' हा तेलुगू भाषेतील चित्रपट ओटीटीव रिलीजसाठी सज्ज आहे.

हा एक रोमँटिक आणि मनोरंजनात्मक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून २३ सप्टेंबर रोजी तो जिओ हॉटस्टारवर येणार आहे. सरकीत हा मल्याळम चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार असून तो २६ सप्टेंबर रोजी मनोरमा मॅक्स या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे. शो टू मच हा शो लवकरच प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

शो टू मच कार्यक्रम प्रेक्षकांना पाहता येणार 

शो टू मच कार्यक्रम २५ सप्टेंबरपासून येत असून यामध्ये काजोल आणि ट्विंकल खन्ना यांनी सूत्रसंचालन केलं आहे. नवरात्रीच्या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम प्रदर्शित केले जाणार आहेत. चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है हा भक्तिमय कार्यक्रम नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांना पाहता येईल. अनेक परदेशी वेबसिरीजचे शो प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.