दिलीप प्रभावळकर अभिनित 'दशावतार' चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे. कोकणच्या पार्श्वभूमीवरील या चित्रपटाने १० दिवसांत १५.८३ कोटींची कमाई केली असून, दिवसेंदिवस त्याच्या कमाईत वाढ होत आहे.

दशावतार चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. कोकणच्या थीमवर आधारित असणारा या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. दिलीप प्रभावळकर यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर येऊन १० दिवस उलटून गेले तरी चांगले पैसे कमवत आहे. आपण या चित्रपटाने आतापर्यंत किती कमाई केली याबद्दल माहिती जाणून घेऊयात.

पहिल्या दिवशी किती कमाई केली? 

पहिल्या दिवशी दशावतार या चित्रपटाने ५८ लाखांची बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे. हा २०२५ मधला सर्वात मोठा रेकॉर्ड ठरला असून दुसऱ्या कोणत्याही चित्रपटाने आतापर्यंत इतकी मोठी कमाई केली नव्हती. दिलीप प्रभावळकर यांचे वय ८१ वर्ष असून त्यांनी तरुणांना लाजवेल असा अभिनय या चित्रपटातून करून दाखवला आहे.

दहाव्या दिवशी जमवला ३ कोटींचा गल्ला 

या चित्रपटाने दहाव्या दिवशी ३ कोटींचा गल्ला जमवला आहे. हि चित्रपटाची आतापर्यंतची सर्वात मोठी कमाई ठरली आहे. सिनेमा सिलीज होऊन जास्त दिवस झाल्यानंतर त्याची कमाई कमी होत जाते पण या चित्रपटाच्या बाबत मात्र आता उलट होत असल्याचं दिसून आलं आहे. जास्त दिवस झाल्यानंतर या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.

कोणत्या दिवशी किती केली कमाई? 

पहिल्या दिवशी – 58 लाख

दुसऱ्या दिवशी – 1.4 कोटी

तिसऱ्या दिवशी – 2.4 कोटी

चौथ्या दिवशी – 1.1 कोटी

पाचव्या दिवशी- 1.25 कोटी

सहाव्या दिवशी- 1.3 कोटी

सातव्या दिवशी – 1.15 कोटी

आठव्या दिवशी – 1 कोटी

नवव्या दिवशी – 2.65 कोटी

दहाव्या दिवशी – 3 कोटी

या चित्रपटाची एकूण कमाई आता 15 कोटी 83 लाखांवर पोहचली आहे. या सिनेमातून कोकण वाचवा असा महत्वपूर्ण संदेश देण्यात आला आहे. या सीएनंत दिलीप प्रभावळकर यांनी बाबुली मेस्त्री हे पात्र साकारलं आहे. हे पात्र अट्टल दशावतार करणारे कलावंत असतात ज्यांनी आपलं आयुष्य या कोकणी परंपरेला वाहिलेलं असतं, पण वयानुसार त्यांना झेपत नाही. हे पात्र करण्यापासून त्यांचा मुलगा त्यांना रोखतो पण नंतर चित्रपटात काय होत हे समजण्यासाठी आपल्याला चित्रपट पाहायला हवा.