सार

मनोज बाजपेयी यांचा 100 वा चित्रपट "भैयाजी" 24 मे रोजी प्रदर्शित होत आहे. त्याचा ट्रेलर नुकताचा रिलीज करण्यात आला आहे. यात मनोज बाजपेयी एकदम दबंग दिसत असून बिहार मध्ये मनोज यांचा रॉबिन हूड अंदाज दिसणार आहे.

मनोज बाजपेयी यांचा 100 वा चित्रपट "भैयाजी" 24 मे रोजी प्रदर्शित होत आहे. त्याचा ट्रेलर नुकताचा रिलीज करण्यात आला आहे. यात मनोज बाजपेयी एकदम दबंग दिसत असून बिहार मध्ये मनोज यांचा रॉबिन हूड अंदाज दिसणार आहे. हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटांप्रमाणे हाताळण्यात आल्याचे ट्रेलरमधुन दिसत आहे.

YouTube video player

ट्रेलर सुरू होताच एक व्यक्ती ‘भैय्या जी’ या व्यक्तिरेखेची ओळख अनोख्या पद्धतीने करुन देतो. तो किती प्रभावशाली व्यक्ती आहे हे त्याच्या वर्णनावरून दिसून येते.भैय्या जी ज्यांना प्रत्येकजण घाबरतो. त्याच्या भावाचा खून झाला आहे. त्यामुळे आता विनंती नाही, नरसंहाराची होणार. यातून मनोज वाजपेयींची धम्माकेदार ऍक्शन पाहायला मिळणार आहे. यानंतर मग ट्रेलरमध्ये मनोज बाजपेयींची एन्ट्री होती. या चित्रपटाचं संपूर्ण कथानक बिहारमधील एका गावाभोवती फिरताना दिसत आहे. विशेष म्हणजे चित्रपटात ॲक्शनसाठी बॉडी डबलचा वापर केलेला नाही. सर्व अॅक्शन मनोज बाजपेयी यांनीच केली आहे. त्यामुळे त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्याचेही त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

मनोजच्या मागील ‘सिर्फ एक बंदा काफी है’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अपूर्व सिंग कार्की यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. मनोज बाजपेयींसाठी हा सिनेमा अत्यंत खास आहे. कारण हा त्यांचा १०० वा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या सिनेमाचं आणखी एक खास वैशिष्ट्य असून या चित्रपटाची निर्माती त्यांची पत्नी आहे.तर यात खलनायकाची भूमिका सुविंदर पाल विकीने साकारली आहे. 

आणखी वाचा :

सलमान खानच्या सिकंदर चित्रपटात 'या' साऊथ अभिनेत्रीची एन्ट्री ! नाव ऐकून व्हाल आनंदी

जान्हवी कपूर शिखर पहारियासोबत तिरुपती येथे लग्न करणार? अभिनेत्रीने दिले हे उत्तर

हा अभिनेता आहे 2025 पर्यंत बिझी, शूटिंगचं कॅलेंडर पाहून सलमान आणि शाहरुखला विसराल