सार

शाहरुख खान, सलमान खान किंवा हृतिक रोशन नाही तर साऊथचा हा सुपरस्टार आहे सर्वात व्यस्त. त्याचे बॅक टू बॅक चित्रपटांची यादी पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल. जाणून घ्या या अभिनेत्याचे 2025 पर्यंतचे कॅलेंडर. 

 

सध्याच्या घडीला सर्वात व्यस्त अभिनेता तुमच्या मते कोण असू शकतो ? शाहरुख खान की सलमान खान की ऍनिमल मधून सगळ्यांवर छाप सोडलेला रणबीर कपूर ? या सगळ्यांच्या नावांपेक्षा ते नाव बॉलीवूड मधील नसून साऊथ चित्रपटातील आहे. तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून प्रभास आहे. प्रभासकडे सध्या इतके काम आहे की त्याला श्वास घ्यायलाही वेळ मिळत नाहीये. जर तुम्ही त्याचे कॅलेंडर पाहिले तर तुम्हाला धक्का बसेल कारण प्रभास पुढील एक वर्ष खूप व्यस्त असणार आहे.

View post on Instagram
 

प्रभासच्या कॅलेंडरनुसार तो जून ते ऑगस्ट या काळात राजा साबच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यातून मुक्त होताच प्रभासकडे 'हनु' नावाचा चित्रपट आहे. ज्याचे शूटिंग ऑगस्ट ते नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. हे शूटिंग संपताच तो नोव्हेंबरपासूनच 'स्पिरिट' नावाच्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा आहेत.या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी जूनपर्यंत सुरू राहणार आहे. तो जून 2025 पासून 'सालार'च्या दुसऱ्या भागाचे शूटिंग सुरू करणार आहे. ही पोस्ट शेअर करताना Keep Loving Cinema ने लिहिले आहे की, प्रभासचा देशातील चाहता वर्ग पाहता त्याच्या चित्रपटांची क्रेझ खूप आहे.

बाहुबलीनंतर हे चार चित्रपट ठरले ब्लॉकब्लास्टर :

बाहुबलीच्या दोन्ही भागांनंतर प्रभासचे चार मोठे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. ज्यामध्ये साहो, राधे श्याम, आदिपुरुष आणि सालार यांचा समावेश आहे. या सर्व चित्रपटांना अपेक्षित प्रेम मिळू शकले नाही. तथापि, प्रभासचे नाव जोडल्यानंतर चित्रपटांनी चांगला नफा कमावला. विशेष म्हणजे फ्लॉप चित्रपट असूनही प्रभासचे मार्केट खाली गेलेले नाही. आणि निर्माते विनासंकोच त्यांच्यावर पैसे गुंतवत आहेत.