सार

सलमान खानच्या आगामी 'सिकंदर' या चित्रपटाबाबत एक आनंदाची बातमी समोर येत आहे. विश्वसनीय सूत्रांनुसार, साऊथची ब्युटी रश्मिका मंदनाने चित्रपटात प्रवेश केल्याचे म्हंटले जात आहे. निर्मात्यांनी पोस्ट करून अधिकृतपणे याची पुष्टी केली आहे.

 

सध्या एकीकडे सलमान खान त्याच्या घरावर झालेल्या गोळीबारामुळे चर्चेत आहे. तर दुसरीकडे तो त्याच्या सिकंदर या चित्रपटामुळे देखील आता चर्चेत आला आहे. लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, सिकंदरबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. हे ऐकून भाईजानच्या चाहत्यांना खूप आनंद होणार आहे. संपूर्ण देशाची नॅशनल क्रश असलेली रश्मिका मंदानाने या चित्रपट एन्ट्री केली आहे. आता ही साउथ स्टार लवकरच बॉलीवूडचा भाईजान सलमान खानबरोबर सिकंदर चित्रपटात झळकणार आहे. 2022 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘गुड बाय’ चित्रपटाद्वारे रश्मिकाने बॉलीवूड सिनेसृष्टीत पदार्पण केलं होत.

View post on Instagram
 

रश्मीकचा तिसरा बॉलीवूड चित्रपट :

2022 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘गुड बाय’ चित्रपटाद्वारे रश्मिकाने बॉलीवूड सिनेसृष्टीत पदार्पण केलं होत.या चित्रपटानंतर 2023 मध्ये रश्मिका संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘ॲनिमल’ चित्रपटात रणबीर कपूरबरोबर झळकली होती. आता रश्मिका मंदाना पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये सलमान खानसोबत चित्रपटात झळकणार आहे.

चाहत्यांसोबत शेअर केली पोस्ट :

या चित्रपटाची अधिकृत घोषणा रश्मिकानं आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. तसेच शेअर केलेल्या पोस्ट मध्ये म्हंटले आहे , तुम्ही सगळे मला माझ्या आगामी चित्रपटाबद्दल विचारत होता.आणि आज मी तुम्हाला ही बातमी देताना अत्यंत आनंदी आहे. मी ‘सिंकदर’ या चित्रपटाचा भाग आहे आणि त्यामुळे मी खूप कृतज्ञ आहे. हा सिनेमा 2025 मध्ये ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे.

रश्मिकाचे आगामी चित्रपट :

अल्लू अर्जुन आणि रश्मिकाचा ‘पुष्पा-2 ‘ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.तसेच रश्मिकाचं ‘छावा’ या हिंदी चित्रपटाचं शूटिंग नुकतंच पूर्ण झालं आहे. त्यात विकी कौशलसोबत झळकणार आहे. ‘द गर्लफ्रेंड’ हा तेलुगू चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.