Deepa Mehta Passes Away : महेश मांजरेकर यांची एक्स-पत्नी आणि प्रसिद्ध कॉस्च्युम डिझायनर दीपा मेहता यांचे निधन झाले आहे. अशातच त्यांचा मुलगा सत्या मांजरेकर याने सोशल मीडियावर भावूक होऊन त्यांचा फोटो शेअर केला आहे.

Deepa Mehta Passes Away : महेश मांजरेकर यांची एक्स-पत्नी आणि कॉस्च्युम डिझायनर दीपा मेहता यांचे निधन झाले आहे. महेश आणि दीपा यांचा मुलगा सत्या मांजरेकर याने सोशल मीडियाद्वारे दीपा यांच्या निधनाची दुःखद बातमी दिली आहे. ही बातमी कळताच सर्वत्र शोककळा पसरली आहे. सर्वजण सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

महेश मांजरेकरांच्या मुलाची भावनिक पोस्ट

महेश मांजरेकर यांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचा मुलगा सत्या मांजरेकर याने आपल्या आईच्या निधनाच्या बातमीला दुजोरा देत तिचा एक जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने इंस्टाग्रामवर लिहिले, 'आई मिस यू मम्मा'. ही पोस्ट पाहिल्यानंतर लोकांनी दीपा यांच्या निधनावर शोक व्यक्त करण्यास सुरुवात केली. तसेच, सत्याला या दुःखद काळात धीर ठेवण्यास सांगितले. महेश मांजरेकर यांनी मात्र अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

कोण होत्या दीपा मेहता?

दीपा मेहता एक प्रसिद्ध कॉस्च्युम डिझायनर होत्या. महेश मांजरेकर यांनी १९८७ साली दीपा मेहता यांच्याशी लग्न केले होते. दोघेही एकमेकांना कॉलेजच्या दिवसांपासून ओळखत होते. तथापि, लग्नाच्या काही वर्षांनंतर १९९५ मध्ये त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या लग्नापासून त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे, ज्यांची नावे अश्वमी मांजरेकर आणि सत्या मांजरेकर आहेत. दीपा यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर महेश यांनी अभिनेत्री मेधा मांजरेकर यांच्याशी लग्न केले, ज्यांच्यापासून त्यांना सई मांजरेकर ही मुलगी आहे.

त्यांचे एक्स-पती महेश मांजरेकर यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास, ते मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेते आहेत. महेश अभिनेत्यासोबतच दिग्दर्शक, निर्माता आणि लेखकही आहेत. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी त्यांनी रंगभूमीवरून आपल्या करिअरची सुरुवात केली. मांजरेकर यांनी 'वास्तव: द रिॲलिटी' (१९९९), 'अस्तित्व' (२०००) आणि 'वॉन्टेड' (२००९) यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे.