सार
‘पॅरासाइट’ सिनेमासाठी ऑस्कर पुरस्काराने गौरवण्यात आलेला अभिनेता ली-सुन क्युन याचा मृत्यू झाला आहे. यामुळे सिनेसृष्टीत शोककळा परसली आहे. ली सुन क्युनच्या मृत्यूबद्दल दक्षिण कोरियातील पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे.
Lee Sun Kyun Death : ऑस्कर पुरस्कारने गौरवण्यात आलेला अभिनेता ली सुन-क्युन याचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती दक्षिण कोरियातील आपत्कालीन ऑफिसने दिली आहे. अभिनेत्याला 'पॅरासाइट' (Parasite) या हॉलिवूड सिनेमासाठी ऑस्कर पुरस्काराने (Oscar Award) गौरवण्यात आले होते.
दक्षिण कोरियातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (27 डिसेंबर 2023) सेऊल (Seoul) येथील एका अज्ञात ठिकाणी कथित रूपात अभिनेता बेशुद्धाव्यस्थेत सापडला. अभिनेत्याच्या मृत्यूबद्दल अधिक माहिती पोलिसांनी शेअर केलेली नाही.
याआधी योनहाप या वृत्त संस्थेसह दक्षिण कोरियातील मीडियाने बातमी दिली होती की, ली सुन क्युन सेऊल येथे मृताव्यस्थेत सापडला आहे. ऑस्कर विजेत्या अभिनेत्याला कथित रूपात ड्रग्जचा वापर केल्याप्रकणी याआधी पोलिसांच्या चौकशीला सामोरे जावे लागले होते.
अभिनेत्याच्या घरात सापडली सुसाइड नोट
सेऊल येथील पार्कजवळील एका गाडीत ली सुन क्युन हा मृताव्यस्थेत सापडला. अभिनेत्याबद्दल हे देखील सांगितले जात आहे की, त्याच्या घरातून एक सुसाइड नोट (Suicide Note) जप्त करण्यात आली आहे.
दक्षिण कोरियात ड्रग्जसंदर्भात कठोर कायदे
दक्षिण कोरियात ड्रग्जसंबंधित कठोर कायदे आहेत. अंमली पदार्थांचा वापर करणाऱ्यांच्या विरोधात दक्षिण कोरियात गंभीर गुन्हे दाखल केले जातात. यामध्ये कमीत कमी सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. अथवा वारंवार अंमली पदार्थांचा वापर केल्यास 14 वर्षांचा कारावास देखील होऊ शकतो.
पॅरासाइट सिनेमासाठी मिळाला होता ऑस्कर
दक्षिण कोरियातील अभिनेता ली याला 'पॅरासाइट' या सिनेमासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. ली याचा जन्म वर्ष 1975 रोजी झाला होता. पॅरासाइट सिनेमातून ली याला संपूर्ण जगभरात प्रसिद्धी मिळाली होती.
वर्ष 2012 मध्ये ली याचा थ्रिलर सिनेमा 'हेल्पलेस' (Helpless) देखील चर्चेत राहिला होता. ली हा कोरियातील प्रसिद्ध टेलिव्हिजन शोमध्येही झळकला होता.
आणखी वाचा:
पॉप स्टार दुआ लिपा सोशल मीडियात होतेयं ट्रोल, नक्की कारण काय? वाचा सविस्तर…
Oscars 2024: 96 व्या ऑस्कर पुरस्कारासाठी या सिनेमांना मिळालेय नामांकन, पाहा यादी