सार

Bigg Boss 18 Updates : सलमान खानचा आगामी टेलिव्हिजन शो बिग बॉस 18 ची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच शो मध्ये बॉलिवूडमधील तीन मोठे स्टार येण्याची शक्यता आहे. याशिवाय सलमान खानची एक्स गर्लफ्रेंडही येणार असल्याचे बोलले जात आहे. 

Bigg Boss 18 Updates :  बिग बॉस ओटीटी-3 नंतर सर्वांचे लक्ष बिग बॉस-18 कडे लागले आहे. शो संबंधित सूत्रांकडून वेळोवेळी अपडेट्स शेअर केले जात आहेत. अशातच बिग बॉस 18 बद्दल एक मोठी अपडेट समोर आले आहे. असे सांगितले जात आहे की, यामध्ये बॉलिवूडमधील तीन मोठे स्टार शो मध्ये झळकण्याची शक्यता आहे. यामध्ये ईशा कोप्पिकर (Isha Koppikar), समीरा रेड्डी (Sameera Reddy) आणि शायनी अहुजाचे (Shiney Ahuja) नाव घेतले जात आहे. एका सिनेमाच्या कारणास्तव बिग बॉस ओटीटी-3 पासून सलमान खान दूर राहिला होता. पण आता शो च्या 18 व्या सीझनचे सूत्रसंचालन करणार आहे.

बिग बॉसच्या 18 मधील स्पर्धकांची नावे
बिग बॉस 18 बद्दलच्या चर्चांनी जोर धरला आहे. यामधील संभाव्य स्पर्धकांची नावे समोर येत आहेत. शो मध्ये बॉलिवूड, सोशल मीडिया, युट्यूब आणि टेलिव्हिजनवरील कलाकार घरात एन्ट्री करू शकतात. काही बड्या कलाकारांच्या नावांचाही विचार केला जात आहे. यामध्ये सर्वाधिक पहिले नाव ‘कृष्णा कॉटेज’ आणि ‘डॉन’ सारख्या सिनेमात काम करणारी ईशा कोप्पिकरचे नाव आहे. दुसरे नाव ‘रेस’ आणि ‘मैंने दिल तुझको दिया’सारख्या सिनेमात काम केलेली समीरा रेड्डीचे नाव आहे. अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. याव्यतिरिक्त ‘गँगस्टर’ आणि ‘वो लम्हे’ सारख्या सिनेमांमध्ये नजर आलेला शायनी अहूजाही झळकण्याची शक्यता आहे.

सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडचीही चर्चा
बातम्यांनुसार, सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीच्या नावाचा विचार सुरू आहे. एककाळ असा होता ज्यावेळी सोमी सलमान खानच्या प्रेमात वेडी होती. यासाठी घर-परिवार सोडून सोमी पाकिस्तानातून मुंबईत आली होती. मुंबईत आल्यानंतर सिनेमात काम करण्यास सुरुवात केली. यावेळी सोमीची सलमान खानसोबत भेट घडली. दोघांमध्ये रिलेशनशिप सुरु झाले होते. पण नाते दीर्घकाळ टिकले नाही मोडले गेले. यानंतर सोमीने सलमानवर फसवणूकीचा आरोप लावला होता.

बिग बॉस 18 प्रीमियर अपडेट
बिग बॉस 18 चा प्रीमियर ऑक्टोंबरच्या पहिल्या शनिवारी होणार होता. जो, 5 ऑक्टोंबरला आहे. प्रोडक्शन टीमच्या एका सूत्रांनी Siasat.com ला सांगितले की, आम्ही सलमान खानला बिग बॉसच्या सूत्रसंचालनच्या रुपात पाहण्यासाठी उत्सुक आहोत. चाहत्यांना यंदाच्या सीझनमध्ये काही मजेशीर आणि धमाकेदार गोष्टी पाहण्यास मिळणार आहेत.

आणखी वाचा : 

BB Marathi : बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सीच्या पदासाठी सदस्यांमध्ये धक्काबुक्की

Naga Chaitanya-Sobhita Dhulipala यांच्या साखपुरड्याचे पाहा First Photos