सार
कंगना रणौतने एका मुलाखतीत बॉलिवूडमधील काळ्या बाजूची पोलखोल केली आहे. कंगनाने म्हटले की, इंडस्ट्रीमध्ये टॅलेंडची कदर केली जात नाही. अशा व्यक्तींना बाजूला केले जाते. याशिवाय कंगाने अन्य काही खुलासे देखील इंडस्ट्रीबद्दल केले आहेत.
Kangana Ranaut on Bollywood : अभिनेत्री कंगना राणौतने पुन्हा एकदा बॉलिवूडला निशाण्यावर धरले आहे. अभिनेत्रीने बॉलिवूडमधील काळ्या बाजूचे काही धक्कादायक खुलासे एका मुलाखतीतून केले आहेत.कंगनाने तिचा आगामी सिनेमा इमरजेंसीच्या प्रमोशनवेळी इंडस्ट्रीमधील काही खुलासे केले. अभिनेत्रीने म्हटले की, फिल्म इंडस्ट्रीमध्ये एकमेकांवर जळकुटेपणाची भावना असल्याने काही कलाकारांचे करियर बुडले गेले आहे.
कंगना राणौत नक्की काय म्हणाली…
कंगना राणौतने मॅशेबल इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, मी खरं सांगतेय बॉलिवूड एक निराशाजनक ठिकाण आहे. यांचे काहीही होणार नाही. एकतर काहीजण तुमच्यामधील टॅलेंटवर जळतात. याशिवाय ज्यांच्यामध्ये टॅलेंट असते त्यांना दूर किंवा बॉयकॉट करत करियर संपवतात.
इंडस्ट्रीमधील सामान्य व्यक्तीचे अस्तित्व
कंगाने पुढे म्हटले की, काहीजणांना माझी अडचण होते. खरंतर, मी निवडणूक लढवत विजय मिळवला आहे. याशिवाय इंडस्ट्रीने ज्या पद्धतीने माझ्यावर प्रेम केले ते माझ्यासाठी पुरेसे आहे. यामुळे समस्या माझ्यामुळे आहे की त्यांच्यामुळे? असा सवालही कंगानाने मुलाखतीवेळी उपस्थितीत केला.
अभिनेत्रीसह भाजपाची खासदार
कंगना राणौत आता अभिनेत्रीच नव्हे राजकीय नेता देखील आहे. यंदाच्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिमाचलमधील मंडी येथून भाजपा खासदार म्हणून कंगनाचा विजय झाला आहे.अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, कंगना राणौतचा आगामी सिनेमा इमरजेंसी येत्या 6 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शन आणि निर्माती कंगनाच आहे. सिनेमाची कथा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर आधारित आहे. इमरजेंसी सिनेमात कंगनाशिवाय अनुपम खैर, सतिश कौशिक, श्रेयस तळपडे, महिमा चौधरी आणि मिलिंद सोमण असे कलाकार झळकणार आहेत.
आणखी वाचा :
Bigg Boss 18 सीजनसाठी या 8 जणांनी दिला नकार, निर्माते पडले अडचणीत
मल्याळम नव्हे बॉलिवूडमधील या 5 कलाकारांवरही लागलेत लैंगिक अत्याचाराचे आरोप