बिग बॉसचा 18 वा सीजन येत्या 5 ऑक्टोंबरपासून सुरु होणार आहे. यासाठी काही कलाकारांना विचारण्यात येत आहे. पण काही स्टार्सनी शो ची ऑफर नाकारली आहे.
धर्मगुरु अनिरुद्धाचार्य महाराज सध्या चर्चेत आहेत. बिग बॉसकडून अनिरुद्धाचार्यांना ऑफर देण्यात आली होती.
सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने बिग बॉसच्या घरात एन्ट्री करण्यासाठी नकार दिला आहे.
बिग बॉस ओटीटी-3 मध्ये झळकलेल्या विशाल पांडेने सीजन 18 साठी नकार दिला आहे.
गेल्या काही वर्षांपासून बिग बॉसकडून सुरभी ज्योतिला शो साठी विचारले जात आहे. यंदाही सुरभीने बिग बॉससाठी नकार दिला आहे.
बॉलिवूडमधील अभिनेत्री ईशा कोप्पिकरने बिग बॉसच्या घरात एन्ट्री करण्यास नकार दिला आहे. याबद्दलची एक पोस्टही अभिनेत्रीने शेअर केली होती.
प्रसिद्ध अभिनेत्री अनिता हसनंदनीला बिग बॉस 18 साठी विचारण्यात आले होते. पण अभिनेत्रीने नकार दिला आहे.
टेलिव्हिजन अभिनेता अर्जुन बिजलानी बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणार असल्याचे ठरले होते. पण अभिनेत्याने ऑफर नाकारली आहे.
बिग बॉस 18 ची घोषणा झाल्यानंतर सर्वप्रथम शोएब इब्राहिम घरात एन्ट्री करणार असल्याचे बोलले जात होते. पण अभिनेता शो चा हिस्सा नसणार आहे.
Ranveer Singh व्यतिरिक्त या बॉलिवूड कलाकारांनीही सोडली होती नोकरी
Janmashtami 2024 : श्रीकृष्णाच्या आयुष्यावरील 6 सिनेमे, नक्की पाहा
जया बच्चन यांना ऐश्वर्या राय सून म्हणून नको होती?
मराठीतील हे 7 सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार, पाहा लिस्ट