सार

हिमाचल मंडी येथून लोकसभेच्या जागेवर कंगना राणौतचा विजय झाला. पण चंदीगड विमानतळावर सुरक्षिततेच्या कारणास्तव केल्या जाणाऱ्या तपासणीवेळी CISF च्या एका महिला अधिकाऱ्याने कंगनाच्या चक्क कानशिलात लगावल्याचा प्रकार समोर आला आहे.

Kangana Ranaut Slap Case: चंदीगड विमानतळावर अभिनेत्री आणि नवनिर्वाचित खासदार कंगना राणौतसोबत सीआयएसएफच्या एका महिला अधिकाऱ्याने गैरवर्तवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळेच कंगना राणौत सध्या चर्चेत आली आहे. खरंतर, कंगना राणौतने म्हटले होते की, पंजाबमध्ये वाढता दहशतवादी विचार एक चिंतेची बाब आहे. यावरच माजी मंत्री आणि शिरोमणि अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हरसिमरत यांनी म्हटले की, पंजाबीच सर्वाधिक मोठे देशभक्त आहेत. जे सीमेवर आणि अन्नदाताच्या रुपात देशाची सेवा करत आहेत.

हरसिमरत कौर यांची सोशल मीडियावरील पोस्ट
हरसिमरत कौर यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट शेअर करत म्हटले की, मी केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे लक्ष देण्यासह त्यांना देण्यात आलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी आग्रह करते. कोणालाही पंजाबी नागरिकांना दहशतवादी अथवा अतिरेकी बोलणे आणि सांप्रदायिक विभाजनला प्रोत्साहन देण्याची परवानगी देऊ नये. पंजाबीच सर्वाधिक मोठे देशभक्त आहेत.

चंदीगड विमानतळावर काय घडले?
कंगना राणौत गुरुवारी चंदीगड विमानतळावर पोहोचली असता तेथील CISF मधील एक सुरक्षा अधिकारी कुलविंदर कौर यांनी तिच्या कानाखाली मारली. याशिवाय कंगनाला शिविगाळही केली. घटनेनंतर आरोपी महिला अधिकाऱ्याला ताब्यात घेतले आणि तिच्या विरोधात गुन्हा दाखल करत निलंबित केले. या प्रकरणात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाने न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.

सदर महिला अधिकाऱ्याचे असे म्हणणे होते की, शेतकरी आंदोलकांच्या विरोधात कंगाने विधान केले होते. कौरचा एक कथित व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये कौर म्हणतायत की, कंगनाने वर्ष 2020 मध्ये एका विधानात म्हटले होते शेतकरी आंदोलन करणाऱ्या महिलांना 100-200 रुपये दिले जातात. त्यावेळी कौर यांच्या आई देखील आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

घटनेनंतर कंगना राणौतची प्रतिक्रिया
कंगना राणौतचे घडलेल्या प्रकरणावर सोशल मीडियात एक व्हिडीओ शेअर केला आहे. कंगना म्हणतेय की, मी सुरक्षित आहे. पण पंजाबमध्ये दहशतवाद आणि अतिरेकीपणा वाढतोय ही चिंतेची बाब आहे. या स्थिताला कसे सावरायचे?

दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी कंगनासोबत घडलेला प्रकार गंभीर असल्याचे म्हटत कार्यवाही करण्याचे मागणी केली आहे. शर्मा यांनी म्हटले की, पॅनने प्रकरण सीआयएसएफकडे उचलून धरले आहे. विमानतळावर सुरक्षिततेसाठी जबाबदार असणारेच सुरक्षिततेचे उल्लंघन करत आहेत.

आणखी वाचा : 

'डेली सोप क्वीन' एकता कपूरच्या 8 महाफ्लॉप मालिका, लिस्ट ऐकून म्हणाल...

'केवळ 4 तास झोपायचा', Chandu Champion सिनेमासाठी कार्तिक आर्यनने अशी केली तयारी