वडिलांनी दारूच्या नशेत केलेल्या या कृत्यामुळे गमवावे लागले संपूर्ण कुटुंब, अभिनेत्याने अनेक वर्षांनी सांगितले मनातील दु:ख

| Published : Apr 13 2024, 12:15 PM IST

kamal sadanah
वडिलांनी दारूच्या नशेत केलेल्या या कृत्यामुळे गमवावे लागले संपूर्ण कुटुंब, अभिनेत्याने अनेक वर्षांनी सांगितले मनातील दु:ख
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Bollywood : वर्ष 1992 मध्ये आलेल्या 'बेखुदी' सिनेमातून कमल सदाना याने आपल्या सिनेसृष्टीतील करियरला सुरूवात केली होती. पण आयुष्यातील काही प्रसंगांनी अभिनेत्याला हादरावून सोडले होते. याबद्दलचाच खुलासा अभिनेत्याने अनेक वर्षांनी आता केला आहे.

Bollywood News : वर्ष 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बेखुदी’ सिनेमातून कमल सदाना (Kamal Sadanah) यांनी हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते. अभिनेत्री काजोलसोबतचा पहिला सिनेमा करण्यासाठी कलम सदाना अत्यंत आनंदीत होते. नुकत्या काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ कनन सोबत बातचीत करताना कलम सदाना यांनी आयुष्यातील काही धक्कादायक किस्स्यांबद्दल खुलासा केला आहे.

कमल सदाना यांनी सांगितले हृदय पिळवटून टाकणारी स्थिती
कलम यांनी म्हटले की, मला आठवतेय माझा 20 वा वाढदिवस होता. त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर वडिलंनी माझी आई, बहिण आणि माझ्यावर गोळीबार केला होता. यानंतर त्यांनी स्वत:वरही गोळ्या झाडून घेतल्या होत्या.

यानंतर आई आणि बहिणीला रुग्णालयात नेले असता तेथे त्यांचा मृत्यू झाला. कमल यांच्या मानेलाही गोळी लागली होती पण मी बचावलो. या संपूर्ण घटनेमुळे खूप मानसिक त्रासही सहन करावा लागला. एका झटक्यात संपूर्ण कुटुंबाची साथ सुटली होती. यानंतर या स्थितीतून बाहेर पडत आयुष्य जगण्याचा विचार केला.

वडील दारूच्या नशेत होते
कमल यांनी म्हटले की, वडील बृज यांनी ज्यावेळी गोळीबार केला त्यावेळी ते दारूच्या नशेत होते. त्यादिवशी माझा वाढदिवस होता. आयुष्यातील सर्वाधिक वाईट दिवस होता. याचा अर्थ असा होत नाही, माझे बालपण किंवा कुटुंब वाईट होते. माझे वडील वाईट होते असेही नाही. गोळीबारानंतर जी स्थिती उभी राहिली होती त्यामध्ये आई-बहिणीसह वडिलांकडेही पाहत होते. त्यावेळी मलाही गोळी लागलीय हे माहिती नव्हते. (Kamal Sadanah Heart Touching Life Story) 

कुटुंबाला गमावले
गोळीबार झाल्यानंतर माझ्यावर शस्रक्रियाही झाल्याचे कमल यांनी सांगितले. शस्रक्रियेनंतर घरी आल्यानंतर संपूर्ण परिवाराने साथ सोडलेली होती. यानंतर अनेक वर्ष वाढदिवसही साजरा केला नाही. काही वर्षांपूर्वी पार्टीही दिली. पण आजही मला वाढदिवस साजरा करण्याचे मन होत नाही. याशिवाय ज्या घरात कुटुंबाला मृत्यूच्या दारात पाहिले तेथे आजही मी राहत असल्याचे कलम यांनी सांगितले. सध्या कमल काही सिनेमांमध्ये सपोर्टिंग अभिनेत्याची भूमिका साकारतात. नुकत्याच कमल यांना 'पीपा' आणि 'सॅम मानेकशॉ' सिनेमामध्ये दिसून आले होते.

आणखी वाचा : 

TMKOC मधील अभिनेत्री जेनिफर मिस्रीवर दु:खाचा डोंगर, भावाच्या मृत्यूनंतर आता लहान बहीण व्हेंटिलेटवर

Netflix ने खरेदी केले अल्लू अर्जुनच्या Pushpa 2 चे अधिकार, इतक्या कोटींची झाली डील