Kalki 2898 AD Box Office : जगभरात 'कल्कि' सिनेमाचा डंका, या चार सिनेमांचा रेकॉर्ड ब्रेक करत रचला इतिहास

| Published : Jul 01 2024, 07:40 AM IST / Updated: Jul 01 2024, 07:44 AM IST

Kalki 2898 AD Kerala collection report out

सार

Kalki 2898 AD World Wide Collection : नाग अश्विन दिग्दर्शित कल्कि 2898 एडी सिनेमाचा सध्या बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे. सिनेमाला संमीश्र प्रतिक्रिया मिळाल्या असल्या तरीही वर्ल्ड वाइड कलेक्शनने धुमाकूळ घातला आहे.

Kalki 2898 AD World Wide Collection : ‘कल्कि 2998 एडी’ यंदाच्या वर्षातील सर्वाधिक मोठा ओपनर सिनेमा ठरला आहे. पौराणिक आणि आधुनिक जगाची कथा मांडलेल्या कल्कि 2998 एडी सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक तुफान गर्दी करताना दिसून येत आहेत. अशातच सिनेमाची जादू भारतात नव्हे परदेशात पहायला मिळत आहे. चार दिवसांमध्ये सिनेमाच्या वर्ल्डवाइड कमाईने इतिहास रचला आहे.

नाग अश्विन यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमाची मोठ्या उत्सुकतेने प्रेक्षकांकडून वाट पाहिली जात होती. दोनदा सिनेमा प्रदर्शित होण्याच्या तारखेत बदल केल्यानंतर अखेर 27 जूनला रिलिज करण्यात आला. सध्या बॉक्स ऑफिसवर सिनेमाची जोरदार कमाई होताना दिसून येत आहे.

कल्कि 2998 एडी सिनेमाची जगभरातील कमाई
प्रभास, अमिताभ बच्चन आणि दीपिका पादुकोणसारखी तगडी स्टारकास्ट असणाऱ्या कल्कि 2998 एडी सिनेमाने जगभरात पहिल्याच दिवशी 191.5 कोटी रुपयांची कमाई केली. एवढी सिनेमाची कमाई पाहता सर्वजण हैराण झाले आहेत. दुसऱ्या दिवशी सिनेमाने 100 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली असून तिसऱ्या आणि चौथ्या दिवशीही कमाईत वाढ झाली आहे.

कल्कि 2998 एडी सिनेमाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर तीन दिवसांची वर्ल्डवाइड कलेक्शनची आकडेवारी शेअर केली आहे. यानुसार एकूण चार दिवसांची जगभरातील कमाई 500 कोटी रुपयांच्या पार गेली आहे.

 

या सिनेमांचा रेकॉर्ड ब्रेक
कल्कि 2998 एडी सिनेमाने अवघ्या तीन दिवसांमध्ये जगभरात धमाकेदार कमाई करत हनुमॅन, फायटर, मंजुमेल ब्वॉइज आणि शैतानसारख्या सिनेमांना मागे टाकले आहे. ‘शैतान’ सिनेमाची जगभरातील कमाई 415 कोटी रुपये, ‘मंजुमेला ब्वॉयज’ 240.5 कोटी रुपये, ‘हनुमॅन’ 295 कोटी रुपये आणि फायटर 358.83 कोटी रुपये होती.

सिनेमातील स्टारकास्ट
कल्कि 2998 एडी सिनेमात प्रभास, अमिताभ बच्चन आणि दीपिका पादुकोण व्यतिरिक्त विजय देवरकोंडा, दुलकर सलमान, कमल हसन आणि दिशा पाटनीसारखे कलाकारही झळकलले आहेत. सिनेमाचे दिग्दर्शक एसएस राजमौली आणि राम गोपाल वर्मानेही कॅमिओ केले आहे. वैजयंती मूवीज निर्मित सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन नाग अश्विन यांनी केले आहे.

आणखी वाचा :

Kalki 2898 AD Review : मास्टरपीस दिग्दर्शन, कथा आणि कल्पनेच्या पलीकडील सिनेमा, वाचा संपूर्ण रिव्हू

27 जूनलाच Kalki 2898 AD सिनेमा प्रदर्शित केला? निर्मात्यांनी सांगितले खास कारण