सार
Kalki 2898 AD Review In Marathi : नाग अश्विन दिग्दर्शित कल्कि 2898 एडी सिनेमा गुरुवारी 27 जूनला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमात प्रभास-दीपिका मुख्य भुमिकेत झळकले आहेत. वाचा सिनेमाचा संपूर्ण रिव्हू सविस्तर...
Kalki 2898 AD Review : दीपिका पादुकोण आणि प्रभास यांचा सिनेमा कल्कि 2898 एडी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाका केल्याचे दिसून आले आहे. याशिवाय प्रेक्षकांची सिनेमाला उत्तम दादही मिळत आहे. अमिताभ बच्चन आणि कमल हसन यांच्यासह तगडी स्टार कास्ट असणारा सिनेमा सुपरहिट ठरत असल्याचे दिसून येत आहे. अशातच वाचा सिनेमाचा संपूर्ण रिव्हू सविस्तर...
सिनेमाची कथा
कल्कि 2898 एडी सिनेमा सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होण्याची मोठ्या उत्सुकने प्रेक्षकांकडून वाट पाहिली जात होती. याशिवाय सिनेमाचे धमाकेदार प्रमोशनही झाले. भारतीय पौराणिक कथांवर आधारित एक सायन्स फिक्शन सिनेमा आहे. सिनेमाची कथा 2898 एडीमधील अखेरचे शहर काशीमधील डायस्टोपियनमधील दाखवण्यात आले आहे. या शहरातील शासकासाची भुमिका साकारलेल्या कमल हसन यांच्याकडून नव्या जगाची कल्पना केली जाते. कल्पना सत्यात उतरवण्यासाठी एक फर्टिलिटी लॅबची स्थापना केली जाते. काही महिलांवर करण्यात आलेल्या संशोधनातून दीपिका पादुकोणची चाचणीसाठी योग्य महिला असल्याचे मानले जाते. अशातच बक्षीसाची अपेक्षा करणाऱ्या प्रभस या कॉम्प्लेक्समध्ये जाण्याचे स्वप्न पाहतो. पण दीपिका पादुकोणचा वाचवण्यासाठी आलेल्या अमिताभ बच्चन यांची भूमिका सर्वांवर छाप पाडताना दिसून येतेय. एकूणच सिनेमाची कथा विज्ञान आणि भारतीय पौराणिक कथांच्या मुद्द्यांवरुन असल्याने प्रेक्षक अनोखा फ्युजन पाहण्यास उत्सुक आहेत.
- सिनेमातील कलाकाराच्या भुमिकेबद्दल थोडक्यात
सिनेमात प्रभावचा स्वभाव विचित्र, चालाख आणि एक शिकारी भैरव असा दाखवला आहे. या भुमिकेला प्रभासने न्याय देण्याचा पुरेपुर प्रयत्न केला आहे. याशिवाय सिनेमात प्रभासच्या अन्य काही भुमिका देखील दाखवण्यात आल्या आहे. - अमिताभ बच्चन यांनी अश्वत्थामाची भुमिका सिनेमात साकारली आहे. बिग बीं नी देखील आपल्या भुमिकेमुळे अन्य पात्रांवर आपली छाप निर्माण केली आहे. अमिताभ बच्चन यांचे काही सिनेमातील काही संवादही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत.
- दीपिका पादुकोणबद्दल बोलायचे झाल्यास तिने सुमतिची भुमिका साकारली आहे. या भुमिकेतून दीपिका पादुकोणने साउथ सिनेमात एण्ट्री केली आहे. दीपिकाची सिनेमातील दमदार भूमिका पाहून तिचे प्रेक्षकांकडून कौतुक केले जात आहे.
- कलम हसन यांची विलेनची भुमिका सिनेमातील पाहण्यासारखी आहे. यास्किनची भुमिका साकारणाऱ्या कलम हसन यांचा लूक कोणीही त्यांना ओखळू शकत नाहीये. याशिवाय आपल्या अभिनयातूनही कलम हसन यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
- सिनेमात एसएस राजामौली, मृणाल ठाकूर, विजय देवरकोंडा, दुलकर सलमान, राम गोपाल वर्मा , अनुदीप यांचा शानदार कॅमिओ आहे.
सिनेमातील खटकलेल्या गोष्टी
कल्कि 2898 एडी सिनेमाचा पहिला भाग फार हळू आहे. यावर अधिक काम केले जाऊ शकत होते. दिग्दर्शकांकडून सिनेमातील सुरुवातीचे काही सीन्स कमी करुन त्याचा वेळ कमी करू शकत होते. प्रभास आणि दिशा पाटनीच्या सीनमध्ये काही ताळमेळ बसत नाहीये. काही रोमँटिक सीन्स इंटरवलपर्यंत फार कमी आहेत. सिनेमातील तांत्रिक गोष्टींबद्दल बोलायचे जोर्डजे स्टोजिलजकोविक यांनी सिनेमॅटोग्राफी उत्तम पद्धतीने केली आहे.
सिनेमाबद्दल एकूणच मत
तुम्ही प्रभास आणि दीपिका पादुकोणचे चाहते असाल तर काहीतरी नव्याने आणि हटके पहायचे असल्यास सिनेमा जरुर पाहा. या सिनेमात भारतीय सिनेमांमध्ये आतापर्यंत न दाखवलेल्या काही गोष्टींचा समावेश आहे.
आणखी वाचा :
27 जूनलाच Kalki 2898 AD सिनेमा प्रदर्शित केला? निर्मात्यांनी सांगितले खास कारण