Kalki 2898 AD Twitter Review : बॉक्स ऑफिसवर प्रभासच्या सिनेमाचा धुरळा, युजर्सने सोशल मीडियात दिल्यात अशा प्रतिक्रिया

| Published : Jun 27 2024, 11:32 AM IST / Updated: Jun 27 2024, 11:34 AM IST

Kalki 2898 AD Twitter Review
Kalki 2898 AD Twitter Review : बॉक्स ऑफिसवर प्रभासच्या सिनेमाचा धुरळा, युजर्सने सोशल मीडियात दिल्यात अशा प्रतिक्रिया
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Kalki 2898 AD First Twitter Review : प्रभास आणि दीपिका पादुकोण स्टार कल्कि 2898 एडी सिनेमा गुरुवारी 27 जूनला जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यासह युजर्सने सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Kalki 2898 AD First Twitter Review : बॉलिवूडमधील अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि साउथ सिनेमातील सुपरस्टार प्रभासचा बहुप्रतिक्षीत कल्कि 2898 एडी सिनेमा 27 जूनला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बहुतांशजणांनी सिनेमा मास्टरपीस असल्याचे म्हटले आहे. सिनेमा प्रदर्शित होण्याआधी त्याची दमदार अ‍ॅडव्हान्स बुकिंग करण्यात आले होते. सिनेमाला प्रेक्षकांनी सकारात्मक रिव्हू दिला आहे. कल्कि 2898 एडी सिनेमाचा पहिला शो अमेरिकेतील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला असता प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. असे सांगितले जातेय की, चाहत्यांनी सिनेमातील प्रभासची एण्ट्री पाहून उत्साह व्यक्त केला आहे.

 

 

 

 

कल्कि 2898 एडी सिनेमाचा पहिला रिव्हू
कल्कि 2898 एडी सिनेमा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहून युजर्सने सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सिनेमाची कथा ते दिग्दर्शनासंबंधित सकारात्मक प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, अपेक्षा पेक्षा अधिक भन्नाट सिनेमा आहे. पण संगीत अधिक उत्तम होऊ शकले असते. आनंद होतोय की, प्रभासने शानदार अभिनय केलाय.

 

 

 

 

कल्कि 2898 एडी सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर
कल्कि 2898 एडी सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. एका युजरने लिहिले की, "हा केवळ सिनेमा नसून सेल्युलाइटमधील क्रांती आहे. हा मास्टरपीस आहे. उत्तम व्हिज्युव्हलाइजेशनसह सिनेमाची कथा आहे." दुसऱ्याने म्हटले की, "उत्तम स्टोरीलाइन, व्हिज्युव्हलाइजेशनसह धमाकेदार सिनेमा आहे. सिनेमा इंटरव्हनंतर अधिक रंगत जातो. यामधील अमिताभ बच्चन यांची भूमिका सर्वांवर भारी पडली आहे."

 

 

 

सिनेमाचे तोंडभरुन कौतुक
कल्कि 2898 एडी सिनेमाचे प्रेक्षकांकडून तोंडभरुन कौतुक केले जात आहे. सिनेमाची कथा, दिग्दर्शनसह व्हिज्युव्हलाइजेशन पाहून प्रेक्षक अव्वाक झाले आहेत. भारतीय सिनेमांमध्ये कधीच न पाहिलेल्या काही गोष्टी कल्कि 2898 एडी मध्ये दिसतायत. सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर आग लावली ते ब्लॉकबस्टर सिनेमा असल्याच्या भरभरून प्रतिक्रिया प्रेक्षक सोशल मीडियावर देत आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

सिनेमातील स्टार कास्ट
600 कोटी बजेट असणाऱ्या कल्कि 2898 एडी सिनेमाचे दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केले आहे. सिनेमात दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन, दिशा पाटनी, कमल हसन, ब्रम्हानंद मुख्य भुमिकेत आहेत. यामध्ये विजय देवरकोंडा आणि दुलकीर सलमान यांचा शानदार कॅमिओ देखील आहे.

आणखी वाचा : 

27 जूनलाच Kalki 2898 AD सिनेमा प्रदर्शित केला? निर्मात्यांनी सांगितले खास कारण

Salaar सिमेमाचा पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक करणार Kalki 2898 AD?