सार

South Actor Junior NTR : जपानमध्ये आलेल्या एकापाठोपाठ एक भूकंपामुळे सर्वचजण हादरले आहेत. जपानमध्ये भूकंप येण्यापूर्वी साऊथ स्टार ज्युनिअर एनटीआर देखील तेथेच होता, अशी माहिती त्यानं ट्विटवर शेअर केली आहे.

South Actor Junior NTR : जपानसाठी (Japan Earthquake) नवीन वर्षाचा पहिलाच दिवस अतिशय भयावह अनुभव देणारा ठरला. सर्वजण नववर्षाचे स्वागत करत असतानाच येथे भूकंपाचे तीव्र स्वरुपातील धक्के बसत होते. रिपोर्ट्सनुसार, 1 जानेवारी रोजी लागोपाठ आलेल्या भूकंपांमुळे जपान हादरले.

यादरम्यान साऊथचा सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरने यासंदर्भात ट्विट करून त्याच्या चाहत्यांना धक्का दिला. ज्युनिअर एनटीआरने ट्विट करत सांगितले की, काही दिवस तो आपल्या कुटुंबीयांसह जपानमध्येच होता आणि भूकंप होण्याच्या काही तासांपूर्वीच आपल्या देशात परतला. मायदेशी परतल्यानंतर जपानमध्ये भूकंप झाल्याची माहिती त्याला मिळाली, तेव्हा त्याला धक्काच बसला.

ज्युनिअर एनटीआरला बसला मोठा धक्का

ज्युनिअर एनटीआरने जपानमध्ये आलेल्या भूकंपासंदर्भात एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्याने जे काही नमूद केले आहे , ते वाचून अनेकांना धक्का बसला आहे. त्याने लिहिलंय की, "आज मी जपानहून मायदेशी परतलो आणि भूकंपाची बातमी ऐकून मला मोठा धक्का बसला. मागील संपूर्ण आठवडा मी माझा वेळे तेथे घालवला. या धक्क्यातून तेथील नागरिक लवकरात लवकर सावरले जावेत, अशी मी प्रार्थना करतो."

यानंतर चाहते पोस्टवर कमेंट करून त्याच्या प्रकृतीबाबत विचारपूस करत आहेत. एका चाहत्याने लिहिले की - देवाचे आभार, तुम्ही सुखरूप देशात परतलात. आणखी एका चाहत्याने म्हटलं की, अण्णा, तुम्ही योग्य वेळी देशात परतलात.

ज्युनिअर एनटीआरचे आगामी सिनेमे  

वर्ष 2023मध्ये ज्युनिअर एनटीआरचा एकही सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकला नाही. तर वर्ष 2022मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'आरआरआर' सिनेमाने जगभरातील बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या सिनेमाने ऑस्कर पुरस्कार देखील पटकावला आहे. तर वर्ष 2024 मध्ये त्याचा ‘देवरा’ सिनेमा रिलीज होणार आहे. 5 एप्रिल रोजी हा सिनेमामध्ये जगभरात प्रदर्शित करण्यात येणार आहे. या सिनेमामध्ये अभिनेत्री जान्हवी कपूर मुख्य भूमिका साकारत आहे. तर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

View post on Instagram
 

आणखी वाचा : 

Earthquake in Japan : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानमध्ये 7.4 रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप, त्सुनामीचाही इशारा 

Salman Khan Video : सलमान खान आणि अभिषेक बच्चनची गळाभेट, VIDEO होतोय तुफान VIRAL

सलमान खानच्या हातातील ब्रेसलेटचे हे आहे रहस्य