सार

Salman Khan Abhishek Bachchan Video : चित्रपट निर्माते आनंद पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रँड पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पण त्यांच्या या पार्टीऐवजी सलमान खान व अभिषेक बच्चनचीच सर्वत्र चर्चा रंगलीय. या दोघांचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.

Salman Khan-Abhishek Bachchan Video : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. दबंग सलमान खानशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते फार उत्सुक असतात. सलमान खानने गुरुवारी (21 डिसेंबर 2023) चित्रपट निर्माते आनंद पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ग्रँड पार्टीमध्ये उपस्थिती दर्शवली.

या पार्टीतील सलमान खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खान आणि अभिषेक बच्चन यांची गळाभेट झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सलमान खान आणि अभिषेक बच्चन यांची गळाभेट

चित्रपट निर्माते आनंद पंडित यांच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये बॉलिवूडमधील कित्येक तारे-तारकांनी हजेरी लावली. महानायक अमिताभ बच्चन, सलमान खान आणि अभिषेक बच्चन यासारख्या दिग्गजांनीही पार्टीमध्ये सहभागी होऊन सोहळ्याची शोभा वाढवली. याच पार्टीमध्ये सलमान खान आणि अभिषेक बच्चनने एकमेकांची गळाभेट घेतली. हे दृश्य दोन्ही अभिनेत्यांच्या चाहत्यांनी यापूर्वी कधीही पाहिले नव्हते, त्यामुळे चाहत्यांनाही सुखद धक्का बसला आहे. 

व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की सलमान खानने महानायक अमिताभ बच्चन यांची गळाभेट घेतली. यानंतर अभिषेकनंही हात मिळवत सलमान खानची गळाभेट घेतली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. चाहतेमंडळी देखील या व्हिडीओवर लाइक व कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

View post on Instagram
 

शाहरुख खानचीही पार्टीत हजेरी

सलमान खानव्यतिरिक्त आनंद पंडित यांच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये बॉलिवूडमधील मोठमोठ्या कलाकारांनीही हजेरी लावली. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान, ऋतिक रोशन, राकेश रोशन, नील नितिन मुकेश, कार्तिक आर्यन, अर्शद वारसी, तुषार कपूर यासह अन्य कलाकारांनीही पार्टीमध्ये उपस्थित दर्शवली होती.

View post on Instagram
 

आणखी वाचा

श्रेयस तळपदेला हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज, पत्नीने भावूक पोस्टद्वारे शेअर केले हेल्थ अपडेट

9th Ajanta-Ellora International Film Festival : सिनेरसिकांना पाहता येणार जगभरातील 55 सर्वोत्कृष्ट चित्रपट

BOX OFFICEनंतर रणबीर कपूरचा ‘Animal’ OTTवरही धुमाकूळ घालणार, जाणून घ्या DETAILS