Ishq-Vishq Rebound पाहून प्रेक्षकांनी सोशल मीडियावर दिल्यात अशा प्रतिक्रिया, म्हणाले...

| Published : Jun 21 2024, 02:20 PM IST / Updated: Jun 21 2024, 02:39 PM IST

Ishq vishk rebound

सार

रोहित सराफ, पश्मीना रोशन, जिब्रान खान आणि नैना अग्रवाल यांचा सिनेमा 'इश्क-विश्क रिबाउंड' नुकताच सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अशातच प्रेक्षकांना कसा वाटला सिनेमा या संदर्भातील प्रतिक्रिया सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्या आहेत.

Ishq-Vishq Rebound Twitter Review : बॉलिवूडमध्ये नुकताच प्रदर्शित झालेला इश्क-विश्क रिबाउंड सिनेमात नवी स्टारकास्ट झळकली आहे. सिनेमातील अभिनेता रोहित सराफने आधीच स्पष्ट केलेय की, 'इश्क विश्क रिबाउंड' सिनेमा शाहीद आणि अमृता रावच्या 'इश्क-विश्क' सिनेमाचा सिक्वल अथवा रिमेक नाहीये. खरंतर, इश्क-विश्क सिनेमा वर्ष 2003 मध्ये प्रदर्शित झाला होता. आता प्रदर्शित झालेला इश्क विश्क रिबाउंड सिनेमा नक्की कसा आहे, प्रेक्षकांच्या पसंतीस पडला का? यावर प्रेक्षकांनी प्रतिक्रिया काय दिल्यात याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...

सिनेमाची कथा
सिनेमात रोहित, पश्मीना आणि जिब्रान हे बालपणापासूनचे मित्रमैत्रीणी दाखवले आहेत. जिब्रान आणि पश्मीना यांचे रिलेशनशिप सुरु होते. पण नंतर दोघांचे ब्रेकअप होते. अशातच रोहन आणि पश्मीनामध्ये जवळीकता वाढू लागते. एकूणच ट्रँगल लव्ह स्टोरी असणाऱ्या सिनेमाच्या कथेवर सोशल मीडियावरील युजर्सने प्रतिक्रिया दिल्या आहेत. या सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

सोशल मीडियावरील युजर्सची प्रतिक्रिया
एका युजरने म्हटले की, सिनेमा मला प्रचंड आवडला. सिनेमा संपल्यानंतरही मी सिनेमागृहातून हसतहसत बाहेर पडलो. दुसऱ्याने म्हटले की, सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहे. खरंतर झेन झी टच सिनेमात दिला गेलाय. तिसऱ्याने म्हटले की, सिनेमातील 'रेहमत' गाणे अत्यंत सुंदर पद्धतीने लिहिले आहे. या गाण्याला जुबिन नौटियाल याने आवाज दिला आहे.

 

 

 

 

 

 

 

पश्मीना रोशनचे बॉलिवूडमध्ये पदार्पण
सिनेमाचे दिग्दर्शन निपुण धर्माधिकारी यांनी केले आहे. हृतिक रोशनही बहीण पश्मीना रोशन आणि जिब्रान खानने बॉलिवूडमध्ये सिनेमातून पदार्पण केले आहे. रिपोर्ट्सनुसार, सिनेमा पहिल्याच दिवशी दोन कोटी रुपयांची कमाई करू शकतो.

आणखी वाचा : 

शत्रुघ्न सिन्हांनी घेतली जावयाची भेट, म्हणाले...

बॉलिवूडमधील हे 12 सिनेमे गाण्यांनीच भरलेत, एकात तर 72 Songs