सिनेसृष्टीचा खरा चेहरा उघडकीस, HEMA समितीच्या रिपोर्ट्समधून धक्कादायक खुलासे

| Published : Aug 20 2024, 12:29 PM IST

Sexual demands in film industry

सार

Hema Committee Report : हेमा समितीच्या रिपोर्ट्सने मल्याळम सिनेसृष्टीचा खरा चेहरा उघडकीस आणला आहे. रिपोर्ट्समध्ये अभिनेत्रींचे लैंगिक शोषण करण्यासह अन्य धक्कादायक खुलासेही करण्यात आले आहेत.

Hema Committee Report : मल्याळम सिनेसृष्टीचा खरा चेहरा उघडकीस आणणारा एक रिपोर्ट्स सध्या समोर आला आहे. हेमा समितीच्या रिपोर्ट्समधून मल्याळम सिनेसृष्टीतील अभिनेत्रींसोबत कशाप्रकारे वर्तवणूक केली जाते याबद्दलचा खुलासा करण्यात आला आहे. सिनेसृष्टीत अभिनेत्रींकडे विचित्र मागण्या केल्या जातात. याशिवाय अभिनेत्रींचे लैंगिक शोषणही केले जाते.

आयोगाने म्हटले आहे की, सिनेसृष्टीतील महिलांना बडे कलाकार, निर्माते आणि प्रतिष्ठिक व्यक्तींकडून शारीरिक सुखाची मागणी केली जाते. हे काम करण्यासाठी अभिनेत्रींना भाग पाडले जाते. महिल सिनेमांमध्ये काम मिळवण्यासाठी शारीरिक सुखासाठी तयार होतात आणि त्यांना कोड नेम दिले जातात. यासाठी जर नकार दिल्यास महिलांना सिनेमात काम दिले जात नाही.

लैंगिक शोषणाबद्दल बोलल्यास मिळते धमकी
रिपोर्ट्सनुसार, एजेंटकडून सिनेसृष्टीत लैंगिक शोषणाला प्रोत्साहन दिले जाते. निर्माते आणि दिग्दर्शक महिलांना अशी काही कामे करण्यास सांगतात जी त्यांना करायची नसतात. एखाद्या महिलेने सिनेसृष्टीत सुरु असणाऱ्या लैंगिक शोषणाच्या विरोधात बोलल्यास अथवा पोलखोल करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना धमकी दिली जाते. अथवा महिलेला सिनेसृष्टीला रामराम ठोकण्यासाठी मजबूर केले जाते.

एकट्याने जाण्यास घाबरतात महिला
रिपोर्ट्समध्ये असेही म्हटले की, सिनेमात काम करणाऱ्या महिला एकट्याने कामावर जाण्यासही घाबरतात. सिनेमात काम करण्याची विचारणा केल्यास त्यांच्याकडे सेक्सची मागणी केली जाते. अशाप्रकारच्या घटनांच्या शिकार झालेल्या महिला पोलिसात तक्रार करण्यासही घाबरतात. महिलांना आपल्याबद्दलची समाजात खिल्ली उडवली जाईल अथवा आपले व्यक्तीमत्व मलिल होण्याची भीती असते.

लैंगिक शोषणाच्या भीतीपोटी महिला सिनेमाच्या सेटवर आपल्या नातेवाईकांसोबत जातात. घरातही त्यांना भीती वाटते. सिनेमाच्या शूटिंगसाठी महिलांना हॉटेलमध्ये रहावे लागते. अशी स्थिती महिलांसाठी अधिक धोकादायक होते. यावेळी नशेत धुंद असणारी पुरुष मंडळी खोलीत शिरतात.

हेमा समितीने दिला ICC संगठना स्थापन करण्याचा सल्ला
हेमा समितीने POSH अधिनियमाअंतर्गत एक अंतर्गत तक्रार समिती तयार करण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये AMMA आणि FEFKA सारख्या सिनेसृष्टीतील उद्योग संघातील प्रतिनिधींचा समावेश आहे. 233 पानांच्या रिपोर्टमध्ये काही संवेदनशील माहिती दिली आहे.

मल्याळम सिनेसृष्टीत काम करणाऱ्या महिलांना येणाऱ्या आव्हानांच्या तपासासाठी वर्ष 2017 मध्ये न्यायाधीश हेमा कमिटीची स्थापना केली होती. रिपोर्ट दीड वर्षानंतर 31 डिसेंबर 2019 मध्ये सरकारकडे सोपवली होती. वर्ष 2017 मध्ये एका प्रमुख अभिनेत्रीसोबत मारहाण केल्यानंतर समितीचे गठन करण्यात आले होते.

आणखी वाचा : 

राजकुमार राव नव्हे Stree सिनेमासाठी 'हा' अभिनेता होता पहिली पसंत

श्रेयस तळपदेच्या मृत्यूच्या बातम्या खोट्या, अभिनेत्याने पोस्ट करत म्हटले...