गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांनी गोविंदाच्या कुटुंबातील काही सदस्य त्यांच्या सुखी संसारावर जळत असल्याचे म्हटले आहे. तसेच, गोविंदाने फसवणूक केल्यास तो भिकारी होईल.
गोविंदाची पत्नी माध्यमांच्या चर्चांमध्ये कायमच राहत असते. तीने गोविंदाच्या अफेअरच्या चर्चांवरून त्याची बाजू मांडली होती. काही दिवसांपूर्वी तिला युट्युबकडून बटन मिळाले. त्या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांच्या अफवा सुरु असतात, पण गणेश चतुर्थीला ते दोघे मीडियाच्या समोर आले आणि सगळ्या चर्चा थांबल्या. आता परत एकदा सुनीता आहुजा परत चर्चेत आल्या आहेत.
सुनीता आहुजा काय म्हणाल्या?
सुनीता आहुजा यांनी गोविंदा आणि त्याच्या कुटुंबियांबद्दल सोशल मीडियावर मत व्यक्त केलं आहे. त्यांच्या कुटुंबातील लोकांना आम्हाला दोघांना एकत्र बघायला आवडत नाही. आम्ही एवढे आनंदी कसे आहोत, हा प्रश्न त्यांना पडत असतो. कारण त्यांची बायको - मुले आता हयात नाहीत. पुढं बोलताना त्यांनी गोविंदा कोणत्या लोकांच्यात उठतो बसतो याबद्दल बोलल्या आहेत.
गोविंदा हा चांगल्या लोकांच्यात उठत बसत नाही, त्यामुळं माझं म्हणणं आहे की तुम्ही चुकीच्या लोकांच्या संपर्कात राहिलात की तुम्हीसुद्धा तसेच होत चालता. माझे फार मित्र मैत्रिणी नाहीत, माझे मुलेच माझी चांगली मित्र मैत्रिणी आहेत. गोविंदाच्या आईबद्दल यावेळी सुनीता यांनी मत व्यक्त केलं आहे. आईबद्दल बोलताना सुनीता या हळव्या झाल्या.
सुनीता आहुजा सासूबद्दल काय बोलल्या?
सासूबाई त्याला म्हणाल्या होत्या की, "तू लग्न केलंस तर सुशीलाबरोबर करशील आणि जर तू कधी तिची फसवणूक केली तर भिकारी होशील, असे त्यांचे शब्द होते. सुनीता पुढे बोलताना म्हणतात की, ज्या दिवशी मला त्याच्या अफेअरबद्दल कळेल की तो माझा विश्वासघात करत आहे. तेव्हा मी स्वतः मीडियासमोर जाऊन सांगेल की याने मला धोका दिला आहे. जो चांगल्या स्त्रीला दुःख देईल तो कधीच सुखी होणार नाही. मी माझं पूर्ण आयुष्य त्याला दिल, आजही मी त्याच्यावर तेवढंच प्रेम करत आहे.


