'Saami Saami' गाण्यावर गणपतीच्या मुर्तीचा फोटो व्हायरल, नेटकरी संतप्त
गणेशोत्सवावेळी गणपतींच्या हटके मुर्ती तयार करण्याचा काहीजणांकडून प्रयत्न केला जातो. अशातच रश्मिकाच्या गाण्यावरील गणपतीच्या मुर्तीचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गणपतीचा व्हायरल झालेला लूक पाहून नेटकरी चांगलेच संतप्त झाले आहेत.
| Published : Sep 05 2024, 11:45 AM IST
- FB
- TW
- Linkdin
गणपतींच्या हटके मूर्ती
गणेशोत्सवावेळी गणपतींच्या हटके मुर्ती तयार करण्याचा काहीजणांकडून प्रयत्न केला जातो. पण गणपतींच्या मुर्तीचा हटके लूक देणे भक्तांच्या भावना दुखावल्यासारखे होते असे अनेकांचे मत आहे. अशातच रश्मिकाच्या गाण्यावरील गणपतीच्या मुर्तीचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
गणपती बाप्पाला कलाकारांचे रुप
गणेशोत्सवावेळी गणपतींच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मुर्ती तयार केल्या जातात. प्रत्येकजण आपल्या पसंतीनुसार गणपती बाप्पाची मुर्ती खरेदी करतो. पण अलीकडल्या काळात गणपतींना एखाद्या सिनेकालाकाराचे रुप देण्याचा प्रकार सुरु झाल्याचे दिसून येत आहे. याचे काही फोटोही आधी व्हायरल झाले आहेत. गब्बर सिंह, बाहुबली अथवा पुष्पाच्या रुपातील बाप्पाच्या मुर्ती तयार केल्याचे व्हिडीओ-फोटो समोर आले होते.
गणपती बाप्पाची कलाकारांसोबत तुलना
कलाकारांच्या सिनेमातील भुमिकेवरुन गणपतीची मुर्ती तयार करणे म्हणजे भाविकांच्या भावना दुखावल्या समान असल्याचे अनेकजणांचे मत आहे. गणपतीची तुलना कलाकारांसोबत करणे स्विकारण्यासारखे नाही. याशिवाय गणपती विसर्जनावेळी गणपतीच्या वेगवेगळ्या आणि अमान्य स्वरुपातील मुर्ती पहायला मिळतात.
रश्मिकाच्या रुपातील बाप्पाची मुर्ती
गणेशोत्सवाचा सण देशभरात धुमधडाक्यात साजरा केला जातो. यावेळी गणपतीची विधीवत पूजा-प्रार्थना केली जाते. अशातच रश्मिका मंदानाचा पुष्पा-2 सिनेमातील सामी-सामी गाण्यावरील मुर्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बाप्पाची अशी मुर्ती पाहून नेटकरी चांगलेच संतप्त झाले आहेत.
पुष्पा सिनेमाची रिलीज डेट
पुष्पा-2 सिनेमा रिलीज होण्यास तयार आहे. याचे शूटिंग अखेरच्या टप्प्यात आहे. येत्या 6 डिसेंबरला जगभरात वेगवेगळ्या भाषेत पुष्पा-2 सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन सुकुमार यांच्याकडून केले जात आहे. जवळजवळ 300 कोटी रुपयांपेक्षा अधिक बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या पुष्पा-2 सिनेमाची प्रेक्षकांकडून आवर्जुन वाट पाहिली जात आहे.
पुष्पा-2 सिनेमाचे ओटीटी अधिकार
पुष्पा-2 सिनेमाचे ओटीटी अधिकार नेटफ्लिक्सने 270 कोटी रुपयांना खरेदी केले आहेत. हिंदी भाषेतील अधिकार 200 कोटींना विक्री करण्यात आले आहेत.
आणखी वाचा :
GOAT Twitter Review : ब्लॉकबस्टर सिनेमा, थलापतिच्या चाहत्यांकडून भरभरून कौतुक