Chandu Champion Social Media Review : कार्तिक आर्यनच्या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर धूम, पाहिला शो पाहून प्रेक्षक म्हणाले...

| Published : Jun 14 2024, 02:39 PM IST

Chandu Champion Social Media Review
Chandu Champion Social Media Review : कार्तिक आर्यनच्या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर धूम, पाहिला शो पाहून प्रेक्षक म्हणाले...
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Chandu Champion Social Media Review: स्पोर्ट्स ड्रामा असणारा 'चंदू चॅम्पियन' सिनेमा 14 जूनला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अशातच जाणून घेऊया सिनेमाचा मीडिया रिव्हू...

Chandu Champion Social Media Review : अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) याचा बहुप्रतीक्षित ‘चंदू चॅम्पियन’ सिनेमा अखेर आज (14 जून) सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या सिनेमातून कार्तिकच्या दमदार अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पडली आहे. याशिवाय अनेक बॉलिवूड कलाकार आणि चाहत्यांनीही कार्तिकच्या सिनेमातील कामाबद्दल कौतूक केले आहे. चंदू चॅम्पियन सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर ट्रेण्डमध्ये आहे. अशातच जाणून घेऊया सिनेमासाठीचा मीडिया रिव्हू....

सिनेमाचा मीडिया रिव्हू
एका युजरने लिहिले की, चंदू चॅम्पियन सिनेमाची कथा मुरलीकांत पेटकर यांची असून अतिशय ईमानदारीने प्रदर्शित केली आहे. कार्तिक आर्यनने सिनेमात दमदार अभिनय केला आहे.

दुसऱ्याने लिहिले की, चंदू चॅम्पियन सिनेमा एक उत्तम सिनेमा असल्याचे वाटते.

काही प्रेक्षकांनी कार्तिक आर्यनच्या सिनेमाला 3 स्टार दिले आहेत.

कार्तिक आर्यनच्या सिनेमाचे पोस्टर शेअर करत अभिनेत्री अनन्या पांडेने म्हटले की, तुम्ही हा सिनेमा पहावा. सिनेमाच्या संपूर्ण टीम आणि क्रू कडून जबरदस्त काम करण्यात आले आहे.

चंदू चॅम्पियन सिनेमाची कथा
कार्तिक आर्यनचा चंदू चॅम्पियन सिनेमाची कथा पॅरालॉम्पिंक गोल्ड मेडलिस्ट मुरलीकांत पेटकर यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या सिनेमात कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहे. सिनेमाला साजिद नाडियावाला आणि कबीर खान यांनी प्रोड्यूस केले आहे. याशिवाय कबीर खान यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. चंदू चॅम्पियन सिनेमाचे बजेट 140 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

आणखी वाचा : 

Sushant Singh Rajput Death Anniversary : सुशांतचे 4747 क्रमांकाशी होते खास कनेक्शन, काय आहे किस्सा जाणून घ्या

चंदू चॅम्पियनसाठी कार्तिक आर्यनसह या कलाकारांनी वसूल केलीय एवढी Fees