सार

Mithun Chakraborty : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Mithun Chakraborty : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या छातीमध्ये दुखू लागल्याने त्यांना कोलकाता येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 'आज तक' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मिथुन चक्रवर्ती यांच्या छातीमध्ये तीव्र स्वरुपात वेदना होऊ लागल्या आणि अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारांकरिता दाखल केले गेले आहे. दरम्यान त्यांच्या प्रकृतीबाबतची सविस्तर माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. 

हॉस्पिटलकडून जारी करण्यात येईल हेल्थ बुलेटिन

शनिवारी (10 फेब्रुवारी) सकाळी 73 वर्षीय ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या छातीमध्ये तीव्र स्वरुपात वेदना होऊ लागल्याने प्रकृती बिघडली. पण अधिकृतरित्या हॉस्पिटलकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच त्यांच्या कुटुंबीयांकडूनही कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही. 

दरम्यान मिथुन चक्रवर्ती यांना वर्ष 2022मध्येही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे वृत्त व्हायरल झाले होते, यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. पण वडील पूर्णपणे ठणठणीत असल्याची माहिती त्यांचा मुलगा मिमोह चक्रवर्तीने दिली होती. मिथुन चक्रवर्ती मूतखड्याच्या समस्येने त्रस्त असल्याची माहितीही त्याने दिली होती.

मिथुन चक्रवर्ती यांचा VIDEO VIRAL

मिथुन चक्रवर्ती यांनी वर्ष 2023मध्ये टीव्ही शो ‘सारेगामापा’मध्ये पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली होती. यावेळेस मुलगा नमाशी चक्रवर्तीने त्यांच्यासाठी एक सुंदर मेसेज व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केला होता. मुलाने व्हिडीओच्या माध्यमातून ज्या काही भावना मांडल्या, त्या ऐकल्यानंतर मिथुन खूप भावूक झाले होते. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

'द काश्मीर फाइल्स' मधील दमदार भूमिका

वर्ष 2023मधील सुपरहिट सिनेमा 'द काश्मीर फाइल्स'मध्ये मिथुन चक्रवर्ती यांची दमदार भूमिका पाहायला मिळाली. बंगाली भाषिक सिनेमा 'प्रोजापति', 'काबुलीवाला' या चित्रपटांमध्येही त्यांनी शानदार भूमिका साकारल्या आहेत.

आणखी वाचा

Ayodhya Ram Mandir : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतर अमिताभ बच्चन यांनी पुन्हा घेतले रामललांचे दर्शन

सलमान खानचे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहिले का? युजर्सने म्हटले The Bull येतोय…

हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणला 'Fighter' सिनेमातील या Scene वरुन धाडलीय कायदेशीर नोटीस