सार

बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांनी अयोध्येतील रामललांचे दर्शन घेतले आहे. याशिवाय रामल्लांची पूजा-प्रार्थनाही केली.

Amitabh Bachchan at Ayodhya Ram Mandir :  बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन शुक्रवारी (9 फेब्रुवारी) पुन्हा एकदा अयोध्येत येत त्यांनी रामललांचे दर्शन घेतले आहे. मंदिरात रामलल्लांची अमिताभ बच्चन यांनी पूजा-प्रार्थनाही केली. याआधी राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अमिताभ बच्चन आपला मुलगा अभिषेक बच्चन सोबत आले होते.

अमिताभ बच्चन अयोध्येत आल्यानंतर कठोर सुरक्षाव्यवस्था करण्यात आली होती. सुरक्षाव्यवस्थेतेत अमिताभ बच्चन राम मंदिराच्या परिसरात दाखल होत त्यांनी रामललांचे दर्शन घेतले. यावेळी राम जन्मभूमी मंदिराचे प्रमुख पुजारी आचार्य सत्येंद्र दास आणि ट्रस्टचे पदाधिकारी यांनी अमिताभ बच्चन यांचे स्वागत केले. याशिवाय अमिताभ बच्चन यांनी रामललांची पूजा-प्रार्थना केली.

अमिताभ बच्चन यांनी घेतले रामलल्लांचे आशीर्वाद
रामललांचे दर्शन घेण्यासह अमिताभ बच्चन पूर्णपणे भक्तीत मग्न असल्याचे दिसून आले. यावेळी अमिताभ बच्चन यांनी पांढऱ्या रंगातील कुर्ता आणि नारंगी रंगातील जॅकेट परिधान केले होते. ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी अमिताभ बच्चन यांना टिळा लावून स्वागत केले. अमिताभ बच्चन यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी देखील तुफान गर्दी केली होती.

दरम्यान, अमिताभ बच्चन अयोध्येत एका ज्वेलरी शो रुमचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. रामनगरीत आल्यानंतर विमानतळावरुन अमिताभ बच्चन थेट राम मंदिरात पोहोचले. राम मंदिरात रामलल्लांचे दर्शन घेतल्यानंतर येथून आयुक्त गौरव दयाल यांच्या निवासस्थानी गेले.

आणखी वाचा : 

सलमान खानचे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहिले का? युजर्सने म्हटले The Bull येतोय....

हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणला 'Fighter' सिनेमातील या Scene वरुन धाडलीय कायदेशीर नोटीस

सोनम कपूरच्या आलिशान घराचे Inside Photos पाहिलेत का?