सार
Aryan Khan Viral Video : शाहरुख खानचा लेक आर्यन खानचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आर्यन खान एका पार्टीत मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट झाला आहे. लारिशा बोन्सी असे तरुणीचे नाव असल्याचे सांगितले जात आहे.
Aryan Khan Viral Video : सुपरस्टार शाहरुख खानचा लेक आर्यन खानला अनेकदा पार्टींजमध्ये स्पॉट केले जाते. नुकत्याच एका पार्टीत आर्यनला पाहिले असून तेथील त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आर्यन खान एका मिस्ट्री गर्लसोबत दिसून आला आहे. ही मिस्ट्री गर्ल आर्यन खानची कथित प्रेयसी लारिशा बोन्सी असल्याचे बोलले जात आहे. आर्यनच्या व्हिडीओखाली नेटकऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
आर्यन खानचा व्हायरल व्हिडीओ
आर्यन खानचा व्हायरल व्हिडीओ रविवार (07 जुलै) रात्री मुंबईत झालेल्या एका पार्टीमधील आहे. व्हिडीओमधून डीजेवरील गाणी आणि धुरामध्ये मजा-मस्ती करणारी मंडळी दिसून येत आहेत. याचवेळी आर्यन खान मिस्ट्री गर्लसोबत अधिक जवळीक झाल्याचे दिसून आले आहे. एका इंटरनेटवरील युजरने आर्यनचा व्हिडीओ पाहून कमेंट केली की, त्याच्यासोबतची तरुणी लारिशा आहे का?, दुसऱ्या युजरने, हार्टचा इमोजी शेअर केला असून तिसऱ्याने ही तरुणी लारिशासारखी दिसतेय असे म्हटले आहे.
पार्टी वेन्यू बाहेर आर्यन आणि लारिशा स्पॉट
पार्टीआधी आर्यन खानला वेन्यूच्या येथे स्पॉट करण्यात आले. यावेळी आर्यनने कार्गो पँट, काळ्या रंगातील टी-शर्ट आणि डेनिम जॅकेट घातल्याचे दिसून आले. यानंतर लारिशा बोन्सीलाही पार्टीत जाताना पाहिले. पार्टीमधील आर्यन आणि लारिशाचा एकत्रित व्हिडिओ पाहिल्यानंतर शाहरुखच्या लेकाची कथित गर्लफ्रेंड असल्याच्या चर्चा आता सुरु झाल्या आहेत. गेल्या दीर्घकाळापासून लारिशा आणि आर्यन यांचे रिलेशनशिप सुरु असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण अद्याप दोघांनी आपल्या रिलेशनशिपबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही.
वेब सीरिजमध्ये व्यस्त आर्यन
आर्यनच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो लवकरच आपली पहिली वेब सीरिज 'स्टारडम' वर काम करत आहे. या सीरिजच्या माध्यमातून दिग्दर्शकाच्या रुपात आर्यन खान पदार्पण करणार आहे. सीरिजमध्ये रणवीर सिंह, करण जौहरसह अन्य दिग्गज कलाकारांचा कॅमिओ पहायला मिळणार आहे.
आणखी वाचा :
Kalki 2898 AD सिनेमाचा भारतात रेकॉर्ड ब्रेक, 11व्या दिवशीची वाचा कमाई