सार

शाहरुख खान आपल्या परिवारासोबत अनंत-राधिकाच्या शुभ आशीर्वाद सोहळ्यासाठी आला होता. पण किंग खान कपलच्या पुढच्या फंक्शनला येणार नसल्याची माहिती एका फॅन क्लबद्वारे देण्यात आली आहे. यामागील कारण काय जाणून घेऊया...

Entertainment : शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि गौरी खानने (Gauri Khan) राधिका-अनंतच्या लग्नसोहळ्यासह (Radhika-Anant Wedding)  पुढील फंक्शनला उपस्थिती लावली. यामध्ये दोघांनीही खूप धम्माल-मस्ती केली. पण 14 जुलैला अंबानी हाउस अँटेलिया येथे होणाऱ्या मंगल उत्सवाला उपस्थितीत राहणार नाहीत. एका फॅन क्लबने शेअर केलेल्या व्हिडीओनुसार, शाहरुख खान आणि गौरीला मुंबईतील कलिना विमानतळावर लंडनला रवाना होताना स्पॉट करण्यात आले आहे.

View post on Instagram
 

शाहरुख खान लंडनसाठी रवाना
शाहरुख खानला त्याच्या पांढऱ्या रंगातील लक्झरी एसयुव्हीमधून मुंबई विमानतळावर जाताना पाहिले गेले. खरंतर, व्हिडीओ कारपासून थोड्या अंतरावरुन शूट करण्यात आला आहे. तरीही व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने अंदाज लावला आहे की, गौरीने पांढऱ्या रंगातील टॉप आणि शाहरुखने नारंगी रंगातील हूडी परिधान करत विमानतळावर पोहोचले होते. आता किंग खान आणि गौरी मुंबईत नसतील तर अंबानीच्या मंगल उत्सव सोहळ्याला देखील येणार नाहीत.

शाहरुखने अनंतच्या लग्नात केला धमाकेदार डान्स
जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अनंत आणि राधिकाचा लग्नसोहळा आयोजित करण्यात आला होता. यासाठी शाहरुख आणि गौरी खान शुक्रवारी लंडनमधून मुंबईत दाखल झाले. लग्नाच्या दिवशी शाहरुख खानने हिरव्या रंगातील पठाणी सूट परिधान केला होता. याशिवाय गौरीने गोल्डन रंगातील लेहेंगा परिधान केला होता. या सोहळ्यात शाहरुख आणि नीता अंबानी यांनी डान्स केला.

शाहरुखने अनंत अंबानीच्या लगनात रणबीर कपूर आणि विक्की कौशलसोबत छैया छैया गाण्यावर देखील डान्स केला. याव्यतिरिक्त लग्नसोहळ्याला आलेल्या अमिताभ बच्चन, जया बच्चन यांचे आशीर्वाद घेतले. रजनीकांत यांची देखील शाहरुखने भेट घेतल्याचे दिसून आले.

आणखी वाचा : 

Anant-Radhika Subha Ashirwad : अनंत-राधिकाच्या शुभ आशीर्वाद सोहळ्याला सुरुवात, बॉलिवूड कलाकार ते राजकीय मंडळींची उपस्थिती (PHOTOS)

Anant-Radhika ला आशीर्वाद देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितीत राहण्याची शक्यता, पाहा VVIP पाहुण्यांची लिस्ट