सार

Anant-Radhika Wedding Reception : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचे दुसरे वेडिंग रिसेप्शनला मंगल उत्सव नावाने आयोजित करण्यात आले होते. यावेळी नीता अंबानींनी रिसेप्शनवेळी उपस्थितीत राहिलेल्या पापाराजींसोबत बातचीत करत त्यांची माफी देखील मागितली.

Anant-Radhika Mangal Utsav : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा मंगल उत्सव म्हणजेच वेडिंग रिसेप्शन 14 जुलैला मुंबईत पार पडले. यावेळी काही प्रतिष्ठित व्यक्तींनी उपस्थिती लावल्याचे दिसून आले. रिसेप्शनला आलेल्या पाहुण्यांनी नवविवाहित जोडप्याला लग्नाच्या शुभेच्छा आणि आशीर्वादही दिले. याशिवाय गेल्या काही महिन्यांपासून पापाराजींकडून अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याचे प्रत्येक अपडेट्स कव्हर केले जात होते. म्हणूनच नीता अंबनीनी सर्व पापाराजींचे आभार मानले. याशिवाय 15 जुलैला होणाऱ्या रिसेप्शनलाही सर्वांना आमंत्रित केले आहे. पापाराजींनी अनंतच्या रिसेप्शनला पाहुणे म्हणून येण्याचा आग्रह केला आहे.

नीता अंबानींनी मागितली पापाराजींची मागी
वेडिंग रिसेप्शनवेळी नीता अंबानींनी पापाराजींची माफी मागितली. नीता अंबानींनी पापाराजींसोबत बातचीत करत म्हटले की, "जय श्री कृष्ण...नमस्ते...नमस्ते, तुम्ही सर्वजण एवढे दिवस माझ्या अनंत आणि राधिकाच्या लग्नासाठी येत आहात. आमच्या सेलिब्रेशनचा हिस्सा झाला. तुमचे धैर्य आणि समजूतदारपणासाठी धन्यवाद. काही चूक भूल झाली असल्यास माफ करा कारण लग्नघर आहे." नीता अंबानींनी पुढे म्हटले की, “तुम्हा सर्वांना 15 जुलैसाठी आमंत्रणही मिळाले असेल. तुम्ही सर्वजण पाहुणे म्हणून रिसेप्शनसाठी या. आम्ही तुमची काळजी घेऊ. आम्ही तुमच्या परिवारासोबत स्वागत करण्यासाठी उत्सुक आहोत. पुन्हा एकदा धन्यवाद आणि आभार.”

View post on Instagram
 

नीता अंबानींच्या स्वभावाचे कौतुक
पापाराजींप्रति नीता अंबानींनी केलेल्या वागणूकीमुळे त्यांचे कौतुक केले जात आहे. एका युजरने म्हटले की,"नीता अंबानी अगदी विनम्र आणि ग्राउंडेट आहेत." दुसऱ्याने म्हटले की, "अन्य सेलिब्रेटींनी नीता अंबानींकडून शिकावे.अंबानी परिवार खूप विनम्र आहे." तिसऱ्याने म्हटले की, "नीता अंबानी सर्वांसोबत सन्मान आणि प्रेमाने वागतात. त्यांची नेहमीच प्रगती होईल."

आणखी वाचा : 

Anant and Radhika Merchant Wedding : अनंत अंबानीच्या फेट्याला लावलेल्या कलगीची किंमत 160 कोटी?

Anant-Radhika च्या लग्नसोहळ्यात चक्क मराठमोळे गाणे 'गुलाबी साडी' वर थिरकले पाहुणे, पाहा VIDEO