सार

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा विवाहसोहळा धुमधडाक्यात पार पडला. यावेळी अनंत अंबानीच्या फेट्याला लावलेल्या कलगीची किंमत तब्बल 160 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

Anant and Radhika Merchant Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नसोहळ्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला आहे. अंबानींच्या शंभर कोटींपेक्षा अधिक खर्च करुन केलेल्या लग्नसोहळ्यात अनंत अंबानीने घातलेल्या फेट्यावरील कलगीची किंमत तब्बल 160 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. अनंत आणि राधिकाच्या लग्नाचे रिसेप्शन जिओ वर्ल्ड सेंटरमध्येच होणार आहे. यावेळी जगभरातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थिती लावण्याची शक्यता आहे.

बारातवेळी घातलेल्या फेट्यावरील कलगीची चर्चा
अनंत अंबानने आपल्या बारातवेळी घातलेल्या आउटफिट्सवर गोल्डन रंगातील फेटा घातला होता. यावर डायमंडची कलगी लावण्यात आल होती. याची किंमत तब्बल 160 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. एका इंस्टाग्राम पोस्टनुसार, कलगीच्या किंमतीचे अनुमान लावण्यात आले आहे. हिच कलगी अनंतने साफा सेरेमनीवेळी रेड बांधणीच्या फेट्यावरही घातला होता. अनंत अंबानीच्या आउटफिट्सचे डिझाइन अबू जानी संदीप खोसलाने केले होते. तर स्टायलिंग शालीना नथानींनी केले होते,

अनंत अंबानीने लग्नसोहळ्यात लाल रंगातील शेरवानी परिधान केली होती. जी सब्ससाची मुखर्जीने डिझाइन केली होती. यावर सोन्याचे डिझाइनिंग करण्यात आली होती. याशिवाय शेरवानीवर पाचूचे आणि हिऱ्याची बटणे लावण्यात आली होती.

शुभ आशीर्वाद सोहळ्याला व्हीव्हीआयपींची उपस्थिती
अनंत-राधिकाचा शुभ आशीर्वाद सोहळा 13 जुलैला जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडला. या लहान रिसेप्शनला अनेक व्हीव्हीआयपी (VVIP), राजकीय नेतेमंडळी आणि बॉलिवूडमधील सेलिब्रेटी उपस्थिती लावल्याचे दिसून आले. पाहुण्यांच्या लिस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, ठाकरे परिवार (Thackery Family), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेलिब्रेटी आणि राजकीय नेतेमंडळी आली होती.

14 जुलैला अनंत-राधिकाचा मंगल उत्सव
अनंत-राधिकाच्या लग्नपत्रिकेनुसार, 14 जुलैला मंगल उत्सव होणार आहे. यामध्येही काही बॉलिवूड कलाकार उपस्थितीत राहणार आहेत. याशिवाय 15 जुलैला रिलायन्स जिओच्या कर्मचाऱ्यांसाठी रिसेप्शन ठेवण्यात आले आहे.

आणखी वाचा : 

Anant Ambani-Radhika Merchant Reception : अंबानी परिवाराच्या रिसेप्शनला मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलरची हॉट अंदाजात एण्ट्री, PHOTOS

Anant-Radhika च्या लग्नसोहळ्यात चक्क मराठमोळे गाणे 'गुलाबी साडी' वर थिरकले पाहुणे, पाहा VIDEO