सार

सोशल मीडियात अभिनेत्री कंगना राणौतचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये कंगना एका मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाल्याचे दिसून येतेय. अशातच नेटकऱ्यांकडून कंगना राणौतसोबतचा व्यक्ती कोण? असे प्रश्न विचारत आहेत.

Entertainment : बॉलिवूडमधील अभिनेत्री कंगना राणौतला (Kangana Ranaut) नुकत्याच मुंबईतील एका सलॉन बाहेर स्पॉट करण्यात आले. यावेळी कंगना एका मिस्ट्री मॅनसोबत (Mystery Man) हातात हात पकडून चालताना दिसली. अशातच नेटकऱ्यांकडून कंगना राणौत सोबतचा तो व्यक्ती कोण असे प्रश्न विचारले जात आहेत.

कंगनाला मिस्ट्री मॅनबद्दल विचारले जातायत प्रश्न
कंगनाचा व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, ती सलॉनमधून बाहेर येते. यानंतर एका अज्ञात व्यक्तीचा हात पकडल्याचे दिसून येतेय. कंगनाने यावेळी निळ्या रंगातील ड्रेस आणि गॉगल्स लावला होता. कंगना सोबतच्या व्यक्तीने काळ्या रंगातील लुक कॅरी केल्याचे दिसून आले. अशातच नेटकऱ्यांमध्ये या मिस्ट्री मॅनबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याची फार उत्सुकता आहे.

एका युजरने म्हटले की, कोण आहे हा? दुसऱ्याने म्हटले, कंगनाचा नवा बॉयफ्रेंड आहे का? याशिवाय काहीजण म्हणतातय की, कंगनाने अखेर हृतिक रोशन सारखा व्यक्ती शोधून काढला.

View post on Instagram
 

कंगनाचे लग्नाबद्दल केला होता खुलासा
कंगनाने गेल्या वर्षात लग्नाबद्दल आपले मत व्यक्त केले होते. कंगनाने म्हटले होते की, "प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ असते. यामुळे माझ्या आयुष्यात लग्नाची वेळ यायची असल्यास ती येईलच. मला लग्न करायचे आहे. माझाही परिवार असावा असे वाटते. पण योग्य वेळी सर्वकाही होईल. मी निश्चितच लग्न करेन आणि बाळालाही जन्म देईन. मी स्वत:ला पाच वर्षानंतर एक आई आणि एका पत्नीच्या रुपात पाहात आहे. सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला लवकरच कळेल."

कंगनाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास 'इमरजेंसी' (Emergency) सिनेमात ती झळकणार आहे. या सिनेमात कंगना दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भुमिकेत दिसणार आहे.

आणखी वाचा : 

'गदर', 'धूम-2' सिनेमा नव्हे या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर केलीय सर्वाधिक कमाई

आयरा खानच्या लग्नसोहळ्याचे खास Invitation Card पाहिले का?

दीपिका पादुकोणला आई व्हायचंय? अभिनेत्री म्हणाली...