दादरमध्ये एका व्यक्तीने केले गैरवर्तन, प्रिया बापटचा धक्कादायक खुलासा; नेमकं प्रकरण काय वाचा सविस्तर

| Published : Mar 24 2024, 03:47 PM IST

priya bapat
दादरमध्ये एका व्यक्तीने केले गैरवर्तन, प्रिया बापटचा धक्कादायक खुलासा; नेमकं प्रकरण काय वाचा सविस्तर
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेत्री प्रिया बापटने अलीकडेच एक धक्कादायक बाबा सांगितली. ज्याध्ये तिने २०१० साली तिच्या सोबत झालेले गैरवर्तनाचा खुलासा केला आहे.

एंटरटेनमेंट डेस्क :  प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेत्री प्रिया बापटने अलीकडेच एक धक्कादायक बाबा सांगितली. ज्याध्ये तिने २०१० साली तिच्या सोबत झालेले गैरवर्तनाचा खुलासा केला आहे. ती रस्त्याने चालत असताना एका पुरुषाने तिच्याशी गैरवर्तन केलं होतं. ‘हॉटरफ्लाय’ ला दिलेल्या मुलाखतीत प्रियाने हा धक्कादायक प्रसंग सांगितला आहे.

तिने सांगितल्या नुसार, शूट वरून परतत असताना घरासमोर आले. हातामध्ये बॅग्स आणि त्यात फोन वर बोलत असल्याने तो व्यक्ती समोरून आला, आणि त्याने माझे स्तन पकडले.मला आधी समजलंच नाही नेमकं काय झालं माझ्या सोबत. हे समजायला मला त्यावेळी तीन सेकंद लागले. आणि हे संपूर्ण लक्षात आल्यानंतर मी आजूबाजूला बघितले तर तो माणूस पळून गेला होता.मी संपूर्ण घडलेला प्रकार घरी सांगितलं.

प्रिया बापट ही मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने मालिका, नाटकं, मराठी चित्रपट व हिंदी वेब सीरिज अशा विविध माध्यमांत काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. प्रिया उत्तम अभिनेत्री तर आहेच पण ती खूप स्पष्टवक्तीदेखील आहे. आता एका मुलाखतीत प्रियाने तिला आलेला वाईट अनुभव सांगितला आहे. ती रस्त्याने चालत असताना एका पुरुषाने तिच्याशी गैरवर्तन केलं होतं. ‘हॉटरफ्लाय’ ला दिलेल्या मुलाखतीत प्रियाने हा धक्कादायक प्रसंग सांगितला आहे.

घडलेला प्रकार बाबांना सांगितला:

घरी गेले घरी नेमकी आई नव्हती बाबाच होते. मला समजत नव्हतं काय करावं घडलेला प्रकार बाबांना सांगावा का कि नको सांगायला. मला थोडं घाबरलेला आणि विचारात गुंतलेली पाहून बाबांनीच विचारलं काय झालं ? मी त्यांना घडलेला प्रकार सांगितला. मी माझ्या बाबांकडे बघितलं तर त्या क्षणी ते खूप असहाय्य वाटत होते. जे घडलं त्याचं त्यांना वाईट वाटत होतं आणि काय करावं हे त्यांना कळत नव्हतं. ‘अशा गोष्टी होत असतात,’ असं काहीच ते बोलले नाहीत. तसंच हे तुझ्याबरोबर घडायला नको होतं, मी त्याला मारेन, असंही ते म्हणाले नाहीत. कारण मारणार तरी कसे?” असं प्रिया म्हणाली.

ती घटना आजही मनात कायम:

ज्या माणसाने हे केलं त्याचा उद्देश काय असेल, असा प्रश्न मुलाखतकाराने विचारल्यावर प्रिया म्हणाली, मला वाटतं त्याला कदाचित आनंद घ्यायचा असेल. त्याला रस्त्यावर एक महिला दिसली, जिचे हात रिकामे नव्हते, त्यामुळे त्याला वाटलं की ही काहीच करू शकणार नाही. मी असहाय्य होते आणि त्याने त्या परिस्थितीचा फायदा उचलला या गोष्टीचं जास्त वाईट वाटतं. तेव्हापासून आजवर जर मला कुणाची नजरही वाईट असल्याचं जाणवलं की मला वाटतं ती व्यक्ती येऊन मला स्पर्श करेल, त्याआधी मी जाऊन त्याला पकडावं आणि मारावं. तेव्हाचा राग माझ्यात अजूनही आहे.

आणखी वाचा :

शाहरुख खान आणि उर्फी जावेदची झाली भेट? सेल्फी फोटो शेअर केल्याने चाहते हैराण

Holi 2024 : प्राणप्रतिष्ठापने नंतर पहिल्यांदाच श्रीरामांनी अयोध्येत खेळली होळी