सार
२२ जानेवारी रोजी अयोध्येत मोठ्या उत्साहात राम लल्लाची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच अयोध्येत राम लल्लानी होळी खेळली आहे.
अयोध्याः पवित्र अयोध्या शहरातील श्रीराम मंदिरात भगवान रामाच्या भव्य प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानंतर काही महिन्यांनंतर, राम लल्ला यांनी रविवारी त्यांची पहिली होळी साजरी केली. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने राम लल्ला आणि रंगांच्या उत्सवाचा आनंद लुटणाऱ्या भक्तांची छायाचित्रे शेअर केली आहेत.
बहुप्रतीक्षित असलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे प्राणप्रतिष्ठा केल्या नंतर श्रीरामांची यंदा पहिलीच होळी असल्याने होलिका महोत्सवाचे आयोजन श्री राम जन्मभूमी ट्रस्ट तर्फे करण्यात आले होते. यावेळी मंदिराला आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. तसेच मुख्य आकर्षण म्हणजे श्रीरामांचे वस्त्र आणि होते. सुंदर चेहऱ्यावरचा भाव भाविकांना मोहून टाकणारा होता. त्यामुळे यंदा संपूर्ण अयोध्येत आनंदाचे वातावरण आहे.
श्री राम मंदिराचं वैशिष्ट्य काय?
- राम मंदिर पारंपरिक नागर शैलीत बनवलं जात आहे.
- मंदिराची लांबी (पूर्व ते पश्चिम) ३८० फूट, रूंदी २५० फूट आणि उंची १६१ फूट आहे.
- मंदिर तीन मजली असणार आहे. प्रत्येक मजल्याची उंची २० फूट असेल. मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील.
- मुख्य गाभाऱ्यात प्रभु श्रीरामाचं बालरुप मूर्ती असेल. तर, पहिल्या मजल्यावर श्रीरामाचा दरबार असेल.
- मंदिरात ५ मंडप असतील. नृत्य मंडप, रंग मंडप, सभा मंडप, प्रार्थना मंडप आणि किर्तन मंडप असणार आहेत.
- खांब आणि भिंतींवर कोरलेल्या देवी-देवतांच्या मूर्ती असणार आहेत.
- सिंहद्वारापासून ३२ पायऱ्या चढून पूर्व दिशेकडून मंदिरात प्रवेश होईल.
- दिव्यांग आणि वृद्धांसाठी मंदिरात रॅम्प आणि लिफ्टची व्यवस्था करण्यात येणार आहे.
- मंदिराच्या चारही बाजूंना आयातकार तटबंदी असणार आहे. चारही दिशांना याची एकूण लांबी ७३२ मीटर आणि रुंदी १४ फूट असणार आहे.
- मंदिराजवळ पौराणिक सीताकूप असणार आहे.
आणखी वाचा :
ईडी कोठडीतून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अतिशी मार्लेना यांना कोणते आदेश दिले ?
Ranga Panchami 2024 : रंगपंचमीच्या रंगांमुळे उद्भवू शकते फुफ्फुसासंबंधित समस्या, अशी घ्या काळजी