सार

वर्ष 1996 मध्ये आलेल्या आमिर खान आणि करिश्मा कपूर स्टारर ‘राजा हिंदुस्तानी’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या सिनेमातील एक गाणे आमिरने मद्यधुंद अवस्थेत शूट केल्याचा खुलासा अर्चना सिंह यांनी केला आहे.

Entertainment : ‘कपिल शर्माच्या शो’ मधून प्रेक्षकांसोबत खळखळून अर्चना पूरन सिंह देखील हसतात. अर्चना या वर्ष 1996 मध्ये आलेला आमिर खानचा सिनेमा ‘राजा हिंदुस्तानी’ मध्ये झळकल्या होत्या. सिनेमात अर्चना यांनी आमिरच्या सावत्र आईची भूमिका साकारली होती. या सिमेमातील ‘तेरे इश्क मे नाचेंगे’ गाणे आमिरने मद्यधुंद अवस्थेत शूट केल्याची अफवा उडाली होती. यावरच अर्चना पूरन सिंह यांनी यामागील सत्य सांगितले आहे.

अर्चना यांनी नुकत्या दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, आमिरने' तेरे इश्क में नाचेंगे' गाण्यासाठी खरंच मद्यपान केले होते. यानंतर गाण्याचे शूट झाले होते. खरंतर, आमिरने एक्सपेरिमेंटच्या रुपात ते काम केले होते. कारण गाण्यातील भूमिका खरी दिसावी असे वाटत होते. मला असे वाटते की, त्यावेळी आमिरने मद्यपान केले होते.

सिनेमासाठी मिळाले फिल्मफेयर नॉमिनेशन
सिनेमाबद्दल बोलताना अर्चना यांनी पुढे म्हटले की, मला सिनेमातील बेस्ट सपोर्टिंग अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी नॉमिनेश मिळाले होते. याबद्दल मी खूप आनंदितही होते. पण पुरस्कार मिळाला नाही. यानंतर परमीत सेठी माझ्याजवळ येत म्हणाले, नॉमिनेशन मिळणे हे पुरस्कार जिंकण्यासमान असते.

कपिलच्या सीजन-2 मध्ये झळकणार
‘राजा हिंदुस्तानी’ सिनेमात अर्चना पूरन सिंहने आमिर खानच्या सासूची भूमिका साकारली होती. यामध्ये करिश्मा कपूर आमिरच्या प्रेयसीच्या भूमिकेत झळकली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरवर सुपरहिट झाला होता. धर्मेश दर्शन यांनी दिग्दर्शित केलेला राजा हिंदुस्तानी सिनेमाचे बजेट बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, 5.57 कोटी रुपये होते. द कपिल शर्मा शो च्या दुसऱ्या सीजनची घोषणा करण्यात आली आहे. शो येत्या 21 सप्टेंबरपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर ऑन एअर होणार आहे.

आणखी वाचा : 

हिमेश रेशमियाच्या वडिलांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन

कोलकाता हत्या प्रकरणात पीडितेच्या न्यायासाठी या अभिनेत्रीचे नृत्य