केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सियाचा भाऊ साहिलचा जबाब नोंदवण्यात आला आहे. सिया आणि चेतन यांच्या मैत्रीबद्दल आपल्याला माहिती होती, पण सियाला केतनसोबतच लग्न करायचे होते, असे साहिलने पोलिसांना सांगितले. 'मला चेतनसोबत आनंदी वाटते' असे सियाने म्हटल्याचेही साहिलने उघड केले आहे.

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. सिया आणि चेतन या दोघांची मैत्री आपल्याला माहिती होती अशी माहिती सियाच्या भावानं दिली. त्यामुळं आता एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तब्बल १० ते १२ तास साहिलचा जवाब हा नोंदवून घेतला. मी चेतनसोबत असल्यावर मला आनंदी वाटतं, असं सियाने म्हटल्याचे साहिलने म्हटलं आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

मैत्रीला लोक प्रेम समजतात 

मैत्रीला लोक प्रेम समजतात, असं मी सियाला म्हटलं होत. मला केतनसोबत लग्न करायच आहे, चेतनसोबत नाही असं सियान सांगितल्याचं यावेळी बोलताना केतननं म्हटलं आहे. मी माझ्या आयुष्यात खुश असल्याचं यावेळी बोलताना सियानं म्हटलं होतं. प्रिया आणि केतन या दोघांमध्ये प्री वेडिंगबाबत अनेकवेळा बोलणं झालं होत.

दोन दोन तास कॉलवर बोलायचे 

सिया आणि केतन हे दोन दोन तास कॉलवर बोलायचे असं तिच्या भावानं सांगितलं आहे. चेतन आणि सिया या दोघांच्या रिलेशनशिपची साहिलला आधीच माहिती होती. त्या दोघांनी बालीला जायच्यावेळेला पासपोर्ट हरवला होता. त्यामुळं त्यांचं प्रिवेंडिंग कॅन्सल झाल्याचं सियाच्या भावानं सांगितलं. यावेळी अनेक प्रश्न आता लोकांच्या मनात उपस्थित झाले आहेत.