लोहगड प्रकरणात सिया गोयलने धक्कादायक खुलासा केला आहे. प्रियकर चेतनच्या मदतीने केतन अग्रवालला लोहगडावरून ढकलून दिल्याचे तिने कबूल केले. केतनसोबत रूम शेअर करायची नसल्याने त्याचा खून केल्याची कबुली सियाने दिली आहे.
लोहगड प्रकरणातील केतन अग्रवाल प्रकरणाचे रोज नवीन खुलासे घडताना आपल्याला समोर येत आहे. आता अंगावर काटा येईल अशी माहिती समोर येत आहे. केतन अग्रवालला सिया गोयलने प्रियकर चेतनच्या मदतीने लोहगडावरून ढकलून दिले. त्यानंतर पोलीस कोठडीत असलेल्या सियाने नवीन अपडेट समोर आले आहे.

सियाने केतनचा का केला खून?
सियाने केतनच्या सोबत आपल्याला रूम शेअर करायची नव्हती असं सांगितलं. त्यामुळं आपण त्याचा खून केल्याचं सांगितलं आहे. १९ जून रोजी केतनचा वाढदिवस होता. त्या दिवशी केतनने महाबळेश्वरला जायचा प्लॅन केला होता. पण सियाला तिथं गेल्यानंतर त्याच्यासोबत रूम शेअर करायची नव्हती. त्यामुळं तीन आधल्या दिवशीच चेतनचा काटा काढला.
केतनचा पासपोर्ट फेकून दिला
सियाने केतनचा पासपोर्ट टॉयलेटमध्ये फेकून दिल्यामुळं त्यांचा बालीला प्लॅन रद्द झाला. सियाचा हा प्लॅन यशस्वी झाल्यामुळं तिने खुनाचा प्रयत्न केला. केतनसोबत लग्न न करायचा निर्णय झाल्यामुळं तीन चेतनसोबत खुनाचा प्लॅन केला. त्या दोघांनी मिळून खून केल्याची कबुली सियाने दिली आहे. आता पुढं काय होत याकडं सर्वांचं लक्ष लागून राहील आहे.


