आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन तलाठी भरतीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. मागण्या मान्य न झाल्यास विद्यार्थी रस्त्यावर उतरतील आणि आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच, भविष्यात पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाला तरी आमचे खासदार फुटणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमदार रोहित पवार हे शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटावी म्हणून उपोषणाला बसले होते. आता त्यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न समजून घेतले आहेत. यावेळी बोलताना रोहित यांनी तलाठी भरतीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचं म्हटलं आहे. परीक्षेची तयारी करणारी मुलं गरिबाघरची असून त्यांना ४० ते ५० लाख भरायची त्यांची ऐपत नसल्याचं म्हटलं आहे.

विद्यार्थी रस्त्यावर उतरणार
विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर त्यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. आम्ही आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांना ताकद देण्याचं काम करू. त्यांच्याबरोबर आम्ही आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा इशारा पवार यांनी म्हटलं आहे. त्यांनी यावेळी अजित दादांच्या विमान अपघाताबद्दल यावेळी रोहित पवार यांनी मत व्यक्त केलं.
आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न होऊ शकतो
आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न होऊ शकतो असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. तो करण्यात आला किंवा भविष्यात तो प्रयत्न केला जाऊ शकतो. कितीही प्रयत्न केला तरी आमच्या पक्षाचे खासदार फुटणार नाही. त्यामुळं भविष्यात शरद पवार गटाचे खासदार फुटतात की नाही याकडं जनतेचं लक्ष लागून राहील आहे.


