Crime News : संतापजनक! आजोबांकडूनच दीड वर्षे नातीवर बलात्कार, पीडित मुलगी 9 महिन्यांची गर्भवती

| Published : Apr 18 2024, 07:16 PM IST

rape victim

सार

अकोला जिल्ह्यात ५० वर्षीय आजोबाने आपल्या अल्पवयीन नातीवर गेल्या दीड वर्षापासून अत्याचार केला. यात १७ वर्षीय पीडिता गर्भवती राहिली आहे.या प्रकरणामुळे आजोबा आणि नातीच्या पवित्र नात्याला काळिमा फसली आहे.

अकोल्यात ५० वर्षीय नराधम आजोबाने आपल्या १७ वर्षाच्या नातीलाच वासनेची शिकार बनवत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. आरोपी पीडित बालिकेचा चुलत आजोबा आहे. सदर बालिका यातून ९ महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आरोपीकडून नात्याने नात लागत असलेल्या मुलीवर गेल्या दीड वर्षापासून अत्याचार केला जात होता. विशेष म्हणजे शेजारच्या एका महिलेने पीडितेला अन्य एका तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडले. या लैंगिक शोषणातून पीडिता गर्भवती राहिली. सध्या मुलीचे वय १७ वर्षे असून ती ९ महिन्यांची गरोदर आहे. या प्रकरणी खदान पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आजोबांनीच केले नातीला ब्लॅकमेल :

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी अंघोळ करत असताना तिच्या ५० वर्षीय आजोबाने नग्न फोटो काढले. त्यानंतर हे फोटो दाखवून तिला ब्लॅकमेल करू लागला. आरोपीने तिला कारमध्ये नेत फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. आरोपीने पीडित मुलीसोबत बळजबरीने अनेक वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याबरोबरच अन्य एका तरुणानेही मुलीवर बलात्कार केल्यामुळे पीडिता गर्भवती राहिली.

शेजारच्या महिलेने देखील केले ब्लॅकमेल :

पीडितेच्या शेजारी राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेनेही तिला ब्लॅकमेल करत २३ वर्षीय तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. मुलीवर अकोला व मलकापूर तसेच अन्य ठिकाणी नेऊन वारंवार बलात्कार करण्यात आला. गेल्या दीड वर्षापासून हा धक्कादायक प्रकार सुरू होता. मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. या घटनेनंतर कुटुंबीयांना धक्का बसला आहे.

आरोपीवर बाल संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद :

आरोपी आजोबा आणि शेजारच्या महिलेकडून तिच्यावर अत्याचार करण्यासाठी दबाव होता. या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुबीयांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी आरोपींवर बाल संरक्षण कायदा अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

आजोबा आणि तरुण फारार :

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी चुलत आजोबा व २३ वर्षीय तरुण फरार हे. त्याचा तपास सुरु आहे. ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरु केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

आणखी वाचा :

सलमान खानची हत्या करायची नव्हती...तरीही का केला गोळीबार आणि किती मिळाले पैसे? आरोपींनी केला हा मोठा खुलासा

Crime : पाच वर्षीय चिमुरडीवर नराधमांनी बलात्कार करत केली हत्या, गोव्यातील घटनेने खळबळ