Crime : पाच वर्षीय चिमुरडीवर नराधमांनी बलात्कार करत केली हत्या, गोव्यातील घटनेने खळबळ

| Published : Apr 13 2024, 07:32 AM IST / Updated: Apr 13 2024, 07:37 AM IST

rape 1.jp

सार

दक्षिण गोव्यातील एका बांधकामाधीन ठिकाणी शुक्रवारी (12 एप्रिल) एका पाच वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बलात्कार केल्यानंतर नराधामांनी चिमुरडीची हत्याही केली.

Crime News : दक्षिण गोव्यातील वास्को येथे एका बांधकामाधीन ठिकाणी शुक्रवारी (12 एप्रिल) पाच वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करण्यात आला. यानंतर चिमुरडीची हत्याही केली. या प्रकरणात सध्या पोलिसांनी 20 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

नक्की काय घडले?
एका वरिष्ठ पोलीस अधिकारी सुनीता सावंत यांनी घटनेची माहिती दिली आहे. सुनीता सावंत यांनी म्हटले की, पीडित अल्पवयीन तरुणी वडेम परिसरात बांधकामाधीन ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत दिसली. यानंतर तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले असता तिला मृत घोषित करण्यात आले.

पीडित अल्पवयीन मुलीचे शविविच्छेदन करण्यात आले. या रिपोर्टमध्ये समोर आले की, मुलीवर बलात्कार करण्यात आला. यानंतर तिची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय जवळजवळ 20 संशयितांना वास्को पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्ती आसपासच्या परिसरातील कामगार आहेत. सध्या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याचेही सुनीता सावंत यांनी म्हटले आहे.

याआधी रशियन नागरिकाकडून मुलीवर बलात्कार
फेब्रुवारी महिन्यात गोव्यातच एका रशियन नागरिकाकडून सहा वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. ही घटना नॉर्थ गोव्यातील अरंबोळ परिसरातील होती. या प्रकरणातील आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर पळ काढला होता.

पर्यटकांकडून केल्या जाणाऱ्या गुन्हांमध्ये वाढ
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या डेटानुसार वर्ष 2020 आणि 2021 मध्ये पर्यटकांसंबंधित गुन्ह्यांमध्ये 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. असाही दावा केला जातोय की, सध्याच्या तुलना कोविड महासंकटाच्या वर्षांआधीसोबत केल्यास पर्यटकांमध्ये 12 टक्क्यांची घट झाली आहे.

आणखी वाचा : 

Mumbai Crime News : महिलांचे फोटो मॉर्फ करून व्हायरल केले न्यूड फोटो; मुंबईतील धक्कादायक बाब आली समोर

आईच निघाली वैरी, मित्र मुलीवर बलात्कार करतोय माहिती असूनही शांत बसली

पुणे येथे बनावट शेअर ट्रेडिंग रॅकेटचा पोलिसांकडून भांडाफोड, पाच जणांना अटक