साध्या हळदीपेक्षा आंबे हळद आहे आरोग्यासाठी अधिक लाभदायक, जाणून घ्या 8 फायदे

Health Tips : तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार आंबे हळदीचा वापर केल्यास आरोग्यास कोणकोणते लाभ मिळू शकतात, जाणून घ्या सविस्तर…

Harshada Shirsekar | Published : Jan 8, 2024 5:56 AM IST / Updated: Jan 08 2024, 11:46 AM IST

19
अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म

आंबे हळदीमध्ये कर्क्युमिनोइड्स घटक आहेत, जे आपल्या अँटी- इंफ्लेमेटरी गुणधर्मासाठी ओळखले जातात. यामुळे शरीरावरील सूज कमी करणे व त्यापासून होणाऱ्या आजारांची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते.

29
अन्नाचे पचन

आंबे हळदीच्या सेवनामुळे अन्नाचे पचन देखील सहजरित्या होते, असे म्हणतात. आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते. यामुळे अपचन, सूज आणि गॅस यासारख्या समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते.

39
रोगप्रतिकारक शक्ती

आंबे हळदीमध्ये अँटी-ऑक्सिडेंट्सचे गुणधर्म आहेत. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे संसर्ग व आजारांपासून शरीराचे संरक्षण होण्यास मदत मिळू शकते.

49
अँटी-मायक्रोबिअल गुणधर्म

आंबे हळदीमध्ये अँटी-मायक्रोबिअल गुणधर्म आहेत, जे कित्येक प्रकारच्या सूक्ष्मजीवांपासून होणाऱ्या संसर्गाविरोधात लढण्यास शरीराची मदत करू शकतात.

59
त्वचेसाठी फायदेशीर

त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचारांमध्ये आंबे हळदीचा वापर केला जातो. आंबे हळदीचा फेस पॅकमध्ये वापर केल्यास त्वचेवरील मुरुम, पुरळ सूज किंवा जळजळ होण्याची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते.

69
श्वसनाशी संबंधित समस्या

आंबे हळदीमुळे श्वसनाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळू शकतो, असे म्हणतात. खोकला, सर्दी यासारखे श्वसनप्रणालीशी संबंधित समस्या नियंत्रणात येऊ शकतात.

79
सांधेदुखी

आंबे हळदीमधील गुणधर्मामुळे शरीराला आलेली सूज तसेच सांधेदुखीची समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार याचा वापर केल्यास शरीराचे सांधे मजबूत होऊ शकतात.

89
वेट लॉस

काही अभ्यासांमधील माहितीनुसार, आंबे हळदीमधील औषधी गुणधर्मामुळे शरीराचे वजन कमी होण्यास आणि चयापचयाची क्षमता सुधारण्यास मदत मिळू शकते.

आणखी वाचा :

खमंग मटार कचोरी, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप रेसिपी

गाजर हलव्यामध्ये दूध मिक्स करताना करू नका ही चूक, अन्यथा बिघडेल चव

Saat Kappyache Ghavane : सात कप्प्यांचे घावणे, जाणून घ्या कोकणातील पारंपरिक रेसिपी

99
तज्ज्ञांचा सल्ला

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Share this Photo Gallery
Recommended Photos