गाजर हलव्यामध्ये दूध मिक्स करताना करू नका ही चूक, अन्यथा बिघडेल हलव्याची चव
हिवाळ्यामध्ये गाजराचा गरमागरम हलवा खाण्याची मजा काही औरच असते. गाजर हलव्याची सोपी रेसिपी जाणून घेऊया...
किसलेले गाजर - 500 ग्रॅम, मावा - एक कप, तूप - 1/4 कप, सुकामेवा - आवश्यकतेनुसार, वेलची पावडर - अर्धा चमचा, चिमूटभर केसर, दूध - एक लिटर
सर्वप्रथम गाजर स्वच्छ धुऊन घ्या. यानंतर साल काढून गाजर बारीक किसून घ्या.
एका कढईमध्ये तूप गरम करा. किसलेले गाजर त्यामध्ये परतून घ्या. गाजर शिजेपर्यंत व्यवस्थितीत परतत राहा. मंद आचेवर किसलेले गाजर शिजू द्यावा.
गाजर शिजून नरम झाल्यानंतर त्यामध्ये दूध मिक्स करावे. पण कच्च्या दुधाचा मुळीच वापर करू नये. यानंतर मंद आचेवर 30-40 मिनिटांपर्यंत मिश्रण शिजू द्यावी.
गाजर-दुधामध्ये साखर मिक्स करावी. साखर विरघळेपर्यंत मिश्रण ढवळत राहा. यानंतर मावा देखील मिक्स करावा.
मिश्रणामध्ये मावा व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये सुकामेव्याचे काप, वेलची पावडर, केसर मिक्स करा. हलवा तयार झाल्यानंतर गॅस बंद करावा.
सजावटीसाठीही सुकामेव्याचा वापर करू शकता. यानंतर गरमागरम गाजर हलव्याचा आस्वाद घ्यावा.