सार

कोकणातील प्रसिद्ध पदार्थ सात कप्प्यांचे घावणे (Saat Kappyache Ghavane Recipe in Marathi) कसे तयार करायचे, याची सविस्तर पाककृती जाणून घेऊया

Saat Kappyache Ghavne Recipe : सण-उत्सव म्हटले की आनंद, उत्साह आणि आसपासच्या वातावरणात तयार होणारी सकारात्मक ऊर्जा. प्रत्येक सणानुसार घरामध्ये तयार होणाऱ्या पारंपरिक पक्वान्नांचेही वेगळेच महत्त्व असते. दर बारा कोसावर भाषा बदलत जाते, असे म्हटलं जाते. त्याचप्रमाणे त्या-त्या ठिकाणची प्रसिद्ध असलेली खाद्यसंस्कृतीही अनुभवायला मिळते. हो ना?

या लेखाच्या माध्यमातून आपण कोकणातील सात कप्प्यांचे घावणे (Saat Kappyache Ghavne Recipe In Marathi) या लोकप्रिय पदार्थाची रेसिपी जाणून घेणार आहोत. गणेशोत्सवादरम्यान (Ganeshotsav) बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी अशा प्रकारचे घावणे तयार करण्याची येथे पद्धत आहे. चला तर जाणून घेऊया या स्वादिष्ट पदार्थाची पाककृती….

सामग्री

  • तांदळाचे पीठ - एक कप किंवा तांदूळ रात्रभर भिजत ठेवून ते दुसऱ्या दिवशी सकाळी मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.
  • किसलेले ओले खोबरे - एक कप
  • गूळ - एक कप
  • चिमूटभर मीठ
  • आवश्यकतेनुसार वेलचीपूड

(वाचा : 700 Year Old Ganesha Idol धगधगत्या ज्वालामुखीवर 700 वर्षांपासून विराजमान आहे गणेशमूर्ती, पूजेत कधीही पडत नाही खंड)

सारण असे तयार करून घ्या

  • गॅसच्या मंद आचेवर तुपामध्ये खोबरे आणि गूळ परतून घ्यावे. 
  • मिश्रण तयार झाल्यानंतर गॅस बंद करावा.
  • तयार झालेले सारण एका प्लेटमध्ये काढावे.

सात कप्प्यांच्या घावणांची रेसिपी

  • घावण्याचे बॅटर (How To Make Ghavan From Rice Flour) तयार करून घ्या. तांदळाच्या पिठामध्ये जास्त पाणी मिक्स करू नये, हे लक्षात ठेवा.
  • यानंतर बिडाचा तवा गॅसवर गरम होण्यास ठेवून द्यावा. 
  • तवा गरम झाल्यानंतर घावण्याचे बॅटर (Ghavan Recipe In Marathi) पेल्याच्या मदतीने तव्यावर सोडावे व थोडा वेळ त्यावर झाकण ठेवावे.
  • घावण तयार झाल्यानंतर एकाच बाजूला तयार केलेले सारण घालावे. 
  • यानंतर घावण मध्यातून दुमडावा व दुसऱ्या बाजूला पुन्हा घावण्याचे पीठ तव्यावर सोडावा व पुन्हा तव्यावर झाकण ठेवा. 
  • घावण तयार झाल्यानंतर दुसऱ्या बाजूवर पुन्हा सारण घालावे.
  • हीच प्रक्रिया सात वेळा करावी. 
  • तयार झालेले सात कप्प्यांचे घावणे (Saat Kappyanche Ghavan Recipe Video) एका प्लेटमध्ये काढावे व नैवेद्य दाखवल्यानंतर गरमागरम स्वादिष्ट घावण्यांचा आस्वाद घ्यावा.
View post on Instagram
 

 

Content / Video/ Main Image Credit Instagram @ redsoilstories

आणखी वाचा

धनत्रयोदशीला सोने का खरेदी करावे? यामागे आहेत इतकी शुभ कारणे

Diwali 2023 लक्ष्मीची पूजा या शुभ मुहूर्तांवर करा, जाणून घ्या सविस्तर

Dhanteras 2023 : धनत्रयोदशी सण कधी आहे? जाणून घ्या पूजा-विधि आणि शुभ मुहूर्त