उन्हाळ्यात पनीर खाल्यामुळे शरीराला काय भेटत?
उन्हाळ्यात पनीर खाणं सुरक्षित आहे का? – हा प्रश्न अनेकांना पडतो. खरं सांगायचं तर पनीर हे उन्हाळ्यात खाल्ल्यास शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतं, पण ते योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे खाल्लं पाहिजे.
- FB
- TW
- Linkdin
)

प्रथिनांचा (Protein) उत्तम स्रोत
पनीरमध्ये भरपूर प्रथिने असतात. उन्हाळ्यात घामाने शरीरातील ऊर्जा कमी होते, तेव्हा पनीरमुळे शरीराला ऊर्जा टिकवायला मदत होते.
कॅल्शियम आणि हाडांसाठी फायदेशीर
पनीरमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात – हे हाडं आणि दात मजबूत ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहेत.
थंडसभावी अन्न
पनीर शरीरात उष्णता निर्माण करत नाही. उलट, ते शरीराला थोडासा थंडावा देणारे अन्न मानले जाते. (दूधजन्य असल्याने)
पचनास हलकं
जर फ्रेश आणि सॉफ्ट पनीर खाल्लं, तर ते पचनास हलकं असतं आणि अन्नपचनात मदत करतं.
वजन घटवण्यासाठी सहाय्यक
उन्हाळ्यात हलका आहार घेताना, पनीरसारख्या प्रथिनयुक्त पदार्थामुळे लवकर भूक लागत नाही – त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.