Lifestyle

MATAR KACHORI RECIPE

Winter Special Recipe : खमंग मटार कचोरी, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप रेसिपी

Image credits: social media

मटार कचोरी

हिवाळ्यामध्ये बाजारात मटारची आवक मोठ्या प्रमाणात असते. तसे पाहायला गेले तर मटारच्या कित्येक रेसिपी आहेत, पण हिवाळ्यात मटार कचोरीवर ताव मारणाऱ्या खवय्यांची संख्या भलीमोठी आहे. 

Image credits: social media

सामग्री

2 कप मैदा, 1/4 कप तूप, बेकिंग सोडा, पाणी, मीठ, 1 कप मटार, 1 चमचा जीरे/बडिशेप, लसणाच्या दोन पाकळ्या, 1 मोठा चमचा तेल, अर्धा चमचा किसलेले आले/ मिरची, लाल मसाला, कोथिंबीर, गरम मसाला.

Image credits: Facebook

कचोरीसाठी पीठ मळा

एका भांड्यामध्ये मैदा, तूप, बेकिंग सोडा आणि मीठ मिक्स करा. यानंतर हळूहळू पाणी मिक्स करून पीठ मळा. यानंतर ओल्या कापडाने 15-20 मिनिटे पीठ झाकून ठेवा.

Image credits: youtube

कचोरीचे सारण

मटार मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. एक पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा, त्यात जीरे-बडिशेप, लसूण-आले आणि कापलेली मिरची मिक्स करा. यानंतर शिजवलेले मटार मिक्स करून सारण तयार करा.

Image credits: youtube

असे तयार करा सारण

मटारमध्ये लाल मसाला, गरम मसाला व मीठ मिक्स करून मिश्रण शिजू द्यावे. मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटा. त्यामध्ये कोथिंबीर व चाट मसालाही मिक्स करा.

Image credits: youtube

पुऱ्या लाटा

पुऱ्या लाटून त्यामध्ये कचोरीचे सारण भरा. यानंतर गरम तेलामध्ये कचोरी तळून घ्या.

Image credits: youtube

गरमागरम कचोरीचा आस्वाद घ्या

गरमागरम मटार कचोरीचा चटणीसोबत आस्वाद घ्या. चहासोबतही आपण कचोरी खाऊ शकता. 

Image credits: social media