
Applying Ghee on Body : तूपाला आयुर्वेदात अमृतासमान मानले गेले आहे. याचा वापर अन्नपदार्थांसह त्वचा आणि संपूर्ण शरिरासाठी फायदेशीर ठरतो. शरिरातील वेगवेगळ्या अवयवयांवर तूप लावल्याने आरोग्य आणि सौंदर्यासंदर्भात फायदे गोतात. जाणून घेऊया शरिराच्या कोणत्या भागावर तूप लावणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
नाभीवर लावा तूप
नाभीला शरिराचा केंद्रबिंदू म्हटले जाते. नाभीवर तूप लावल्याने संपूर्ण शरिराला पोषण मिळते. रात्री झोपण्यापूर्वी नाभीमध्ये तूपाचे 2-3 थेंब घालून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. याशिवाय त्वचा मऊसर होण्यासह महिलांमध्ये असंतुलित हार्मोनची समस्याही दूर होते.
पायांच्या तळव्यांना लावा तूप
पायांच्या तळव्यांना तूप लावल्याने आरोग्यासंबंधित काही समस्या दूर होऊ शकतात. रात्री झोपण्यापूर्वी पायांच्या तळव्यांना तूप लावू शकता. पण याआधी पाय स्वच्छ धुवून घ्या. यानंतर तूप लावल्यानंतर पायांना मसाज करा. तळव्यांना तूप लावल्याने शांत झोप लागते. मानसिक शांतता, तणाव कमी होतो आणि डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
ओठांना लावा तूप
फाटलेल्या ओठांच्या समस्येवर तूप रामबाण उपाय आहे. 2-3 दिवस तूप सातत्याने रात्री झोपण्यापूर्वी ओठांना लावल्यास काही फायदे होतात. खरंतर, ओठ मऊसर आणि गुलाबी होतात. याशिवाय काळवंडलेल्या ओठांची समस्या दूर होते.
डोक्याला लावा तूप
केसांसाठी आणि डोक्यासाठी तूपाचा वापर करणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. यासाठी तूप थोडे कोमट गरम करुन घ्या. यानंतर तूपाने मसाज करा. असे केल्याने केसांना पोषण मिळते आणि मजबूत होतात. डोक्यात येणारी खाज, कोड्यांची समस्या आणि तणाव दूर होतो.
गुडघ्यांना लावा तूप
गुडघ्यांना तूप लावल्याने स्नायूंना आराम मिळतो. दररोज सकाळी आणि रात्री गुडघ्यांना तूपाने मसाज करू शकता. यामुळे स्नायूंचे दुखणे कमी होऊ शकते.
आणखी वाचा :
तेलकट त्वचेच्या समस्येवर उपाय, तयार करा हे 3 होममेड Fruit Face Pack
साबण खरेदी करताना या गोष्टींची घ्या काळजी