सार

फ्रान्समध्ये यूपीआय सुविधा लाँच करण्यात आली आहे. अशातच भारतीय प्रवाशांना फ्रान्समध्ये यूपीआयच्या माध्यमातून पेमेंट करणे सोपे होणार आहे.

UPI Goes Global : भारतात सध्या ऑनलाइन पद्धतीने पैशांचे व्यवहार करण्यासाठी पेमेंट इकोसिस्टिमचा फार मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अशातच फ्रान्सने भारतातील डिजिटल पेमेंट सिस्टिम यूपीआयच्या वापराला तेथे परवानगी दिली आहे. याशिवाय फ्रान्समध्ये यूपीआय प्रणाली लाँच करण्यात आली आहे.

शुक्रवारी (2 फेब्रुवारी) फ्रान्समधील भारतीय दूतवासाकडून प्रजासत्ताक दिनाचे रिसेप्शन आयोजित केले होते. आयफेल टॉवरवर (Eiffel Tower) करण्यात आलेल्या रिपेप्शनवेळी   यूपीआय प्रणाली औपचारिक रुपात लाँच करण्यात आली आहे. यामुळे भारतीय प्रवाशांना फ्रान्समध्ये यूपीआयच्या माध्यमातून तेथे पेमेंट करणे सोपे होणार आहे.

यंदाच्या देशाच्या 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (France President Emmanuel Macron) यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली होती. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे देशात जंगी स्वागत करण्यात आले होते.

भारतीय दूतवासाने यूपीआयबद्दल दिली माहिती
फ्रान्स येथील भारतीय दूतवासाने एका औपचारिक कार्यक्रमात यूपीआय प्रणाली लाँच केली. याचे आयोजन आयफेल टॉवर येथे करण्यात आले होते. भारतीय दूतवासाने म्हटले की, यूपीआय प्रणालीला औपचारिक रुपात प्रतिष्ठित आयफेल टॉवरवर प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या सोहळ्यादरम्यान लाँच करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) यूपीआय प्रणाली जागतिक स्तरावर पोहोचवण्यासंदर्भात घोषणा केली होती.

आणखी वाचा : 

Republic Day 2024 : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे भारतीय विद्यार्थ्यांना गिफ्ट, या सुविधेची केली घोषणा

Budget 2024 : सात लाख रूपयांच्या उत्पन्नावर कर द्यावा लागणार नाही, वाचा अंतरिम अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारमण यांनी केलेल्या घोषणेबद्दल सविस्तर

कंत्राटी तत्वावरील महिला कर्मचाऱ्यांना मिळू शकते सशुल्क प्रसूती रजा, सरकारचे कंपन्यांना निर्देश