सार

येत्या 14 फेब्रुवारीला अमेरिकेची चंद्र मोहिम पार पडणार आहे. एका महिन्याआधी अशाच प्रकारची चंद्र मोहिम अमेरिकेकडून करण्यात आली होती. पण त्याला अपयश आले होते.

US Next Moon Mission on 14th Feb : अमेरिकेतील अंतराळ संस्था नासाकडून (NASA) बुधवारी (7 फेब्रुवारी) अमेरिकेच्या चंद्र मोहिमेबद्दल माहिती देण्यात आली आहे. येत्या 14 फेब्रुवारीला अमेरिका चंद्र मोहिम करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. याच्या एका महिन्याआधी अमेरिकेकडून चंद्र मोहिमेचा प्रयत्न केला होता. पण त्याला अपयश आले. खरंतर पृथ्वीवरील वातावरणामुळे अंतराळ यान जळाले होते.

गेल्यावेळी युनाइटेड लाँच एलायंस (United Launch Alliance) कंपनीच्या रॉकेटसोबत एस्ट्रोबोटिक्स लॅण्डर लाँच केले होते. पण आताच्या मोहिमेत थोडा बदल करण्यात आला आहे. स्पेसएक्स रॉकेटसोबत आंतराळ यानाच्या वरच्या बाजूला टेक्सासमधील ह्युस्टन (Houston) येथील Intuitive Machines यांच्याकडून तयार करण्यात आलेले नोव्हा-सी लॅण्डर लावण्यात आले आहे.

पाच दशकानंतर चंद्रावर लॅण्डिंग करणार अमेरिकेतील आंतराळ यान
अमेरिकेची आताची चंद्र मोहिम फत्ते झाल्यास पाच दशकांनंतर अमेरिकेतील कोणतेही आंतरळ यान चंद्रावर लॅण्डिंग करू शकते. खरंतर, चंद्रावर पोहोचणारे खासगी कंपनीचे हे पहिले आंतराळ यान असेल. पाच दशकांआधी अमेरिकेने अपोलो (Apolo) आंतराळ यान चंद्रावर उतवरले होते.

22 फेब्रुवारीला चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणार अंतराळ यान
फ्लोरिडा (Florida) येथील कॅनेडी स्पेस सेंटर येथून 14 फेब्रुवारीला 12 वाजून 57 मिनिटांनी स्पेसएक्सचे रॉकेट लाँच होणार आहे. यानंतर 22 फेब्रुवारीपर्यंत अंतराळ यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरण्याची अपेक्षा केली जात आहे.

चंद्रावर व्यक्तीला पाठवण्याची तयारी करतोय अमेरिका
नासाद्वारे नोव्हा-सी लॅण्डरसोबत चंद्राच्या वातावरणाबद्दल व्यवस्थितीत समजून घेण्यासाठी उपकरणे पाठवत आहे. नासाकडून यंदाच्या दशकाच्या अखेरपर्यंत चंद्रावर व्यक्तीला पाठवण्याची तयारी केली जात आहे. आतापर्यंत फक्त पाच देशांनी चंद्रमोहिम फत्ते केली आहे. सर्वप्रथम सोव्हियत संघानंतर अमेरिका चंद्रावर पोहोचला होता. चंद्रावर व्यक्ती पाठवणारा अमेरिका एकमेव देश आहे. चीन, भारत आणि जपान या देशांना देखील चंद्रावर सॉफ्ट लॅण्डिंग करण्यास यश मिळाले आहे.

आणखी वाचा : 

VIDEO : अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला, पत्नीने परराष्ट्र मंत्र्यांना मदतीसाठी लिहिले पत्र

अयोध्येनंतर UAE मधील भव्य हिंदू मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन, जाणून घ्या खासियत

Israel-India : 71 टक्के इस्राइली नागरिकांनी भारताबद्दल व्यक्त केले हे मत, चीन-पाकिस्तानवर विश्वास नसल्याची दिली प्रतिक्रिया