सार

अमेरिकेतील न्यूजर्सी  येथील शाळेतील एका विद्यार्थिनीचा आर्टिफिशिअल इंटेलिजेंसचा वापर करत डीपफेक फोटो तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. खरंतर हे प्रकरण गेल्या वर्षातील आहे.

US : सध्या बदलत्या तंत्रज्ञानाच्या जगात प्रत्येक दिवशी नवे काहीतरी शिकायला, पाहायला मिळते. अशातच आर्टिफिशिअल इंटेलिजेंसमुळे काही गोष्टी करणे सोपे झाले आहे. पण दुसऱ्या बाजूला आर्टिफिशिअल इंटेलिजेंसचा चुकीच्या गोष्टी करण्यासाठी देखील वापर केल्याचे दिसून येत आहे. या प्रकारचे एक प्रकरण अमेरिकेतील न्यूजर्सी (New Jersey) येथे पाहायला मिळाले होते. गेल्या वर्षी शाळेतील एका मुलाने आर्टिफिशिअल इंटेलिजेंसचा (Artificial Intelligence) वापर करत 14 वर्षीय विद्यार्थिनीचा डीपफेक फोटो (Deepfake Photo) तयार केला होता.

नक्की काय आहे प्रकरण?
गेल्या वर्षात ऑक्टोंबर महिन्यात पीडित मुलीच्या वर्गातील मुलानेच तिचे आर्टिफिशिअल इंटेलिजेंसच्या मदतीने काही अश्लील फोटो तयार केले होते. या प्रकरणानंतर असेही समोर आले की, पीडित मुलीचेच नव्हे तर अन्यकाही मुलींचे देखील डीपफेक फोटो तयार करण्यात आले होते.

डीपफेक फोटो तयार केल्यानंतर ते स्नॅपचॅटवर शेअर करण्यात आले होते. या प्लॅटफॉर्मवर मेसेज ऑटो-डिलिट करण्याचाही पर्याय आहे. या प्रकरणात वर्गातील काही मुलांचा हात होता. पीडित मुलीच्या आईने या प्रकरणात म्हटले की, आरोपींना कठोर शिक्षा मिळाली नाही. रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणातील सर्व आरोपी आता शाळेत जात आहेत.

आर्टिफिशिअल इंटेलिजेंसच्या मदतीने वाढतायत सायबर गुन्हे
याआधी देखील आर्टिफिशिअल इंटेलिजेंसच्या मदतीने सायबर हल्लेखोरांनी डीपफेक फोटो तयार करून नागरिकांना धमकावले आहे. अथवा अन्य सायबर गुन्हे केले आहेत.

काही दिवसांपूर्वी रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. याशिवाय जगातील काही प्रतिष्ठित व्यक्तींचेही डीपफेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. खरंतर आर्टिफिशिअल इंटेलिजेंसचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जात असल्याचे प्रकार सध्या दिवसागणिक वाढले जात आहेत.

आणखी वाचा : 

भारतातील पहिलीच अंडरवॉटर मेट्रो पाहून पाकिस्तानी नागरिक हैराण, दिल्या अशा प्रतिक्रिया (Watch Video)

Video : विमानाच्या उड्डाणानंतर वेगळे झाले चाक, घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली US मधील भारतीय महिला, गमावले तब्बल चार कोटी रुपये