खलिस्तानींनी आम आदमी पक्षाला 16 दशलक्ष डॉलर्सचा निधी दिला, भुल्लरच्याही सुटकेची ऑफर केल्याचा दहशतवादी पन्नूनचा दावा (Watch Video)

| Published : Mar 25 2024, 11:54 AM IST / Updated: Mar 25 2024, 12:07 PM IST

 US-based Khalistani terrorist Gurpatwant Singh Pannun
खलिस्तानींनी आम आदमी पक्षाला 16 दशलक्ष डॉलर्सचा निधी दिला, भुल्लरच्याही सुटकेची ऑफर केल्याचा दहशतवादी पन्नूनचा दावा (Watch Video)
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

अमेरिकेतील खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूनने आम आदमी पक्षाला खलिस्तानींनी 16 दशलक्ष निधी दिल्याचा दावा केला आहे. यासंदर्भातील व्हिडीओही जारी केले आहेत.

Khalistani terrorist Pannun on Arvind Kejriwal : गेल्या काही दिवसांपूर्वीच दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) प्रमुख अरविंद केजरीवाल यांना ईडीने मद्य घोटाळ्यात अटक केली आहे. यामुळे आम आदमी पक्ष वादाच्या कचाट्यात अडकला गेलाय. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेतील खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूनने आम आदमी पक्षाबद्दल मोठे विधान केले आहे.

खलिस्तानी दहशतवादी पन्नूनने म्हटले की, आम आदमी पक्षाला वर्ष 2014 ते 2022 दरम्यान 16 दशलक्ष रुपये दिले. यामुळे पक्षाच्या आर्थिक अखंडतेसह अतिरेकी संघटनांनी संबंध असल्याचा प्रश्न उभा राहत आहे.

खलिस्तानी दहशतवादी पन्नूचे अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप
पुढे पन्नूनने आरोप केलाय की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आर्थिक लाभाच्या बदल्यात दोषी दहशतवादी रेविंदर पाल सिंह भुल्लरची सुटका करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. खरंतर, भुल्लर दिल्लीतील वर्ष 1993 मधील बॉम्बस्फोटातील दोषी आढळला होता.

याशिवाय दहशतवदी पन्नूनने आरोप आरोप केला आहे की, वर्ष 2014 मध्ये गुरुद्वारा रिचमंड हिल्स, न्यूयॉर्क येथे केजरीवाल आणि खलिस्तान समर्थक शीख यांच्यात एक गुप्त बैठक झाली होती. या भेटीदरम्यान केजरीवाल यांनी आर्थिक पाठबळाच्या बदल्यात दहशतवादी भुल्लरची सुटका करण्याचे वचन दिले होते.

लोकसभेसाठी आम आदमी पक्षाची तयारी
लोकसभेसाठी आम आदमी पक्षाकडून “मै भी केजरीवाल” (Main Bhi Kejriwal) कॅम्पेन चालवले जाणार आहे. यासाठी जोरदात तयारी करण्यात आली आहे. दिल्लीत ठिकठिकाणी कॅम्पेनचे घोषवाक्ये लिहिण्यात आलेले स्टिकर्स तयार करून वाहनांवर चिकटवण्यात आले आहेत. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी सुशोभीकरण देखील करण्यात आले आहे.

इंडिया आघाडीची महारॅली निघणार
येत्या 31 मार्चला इंडिया आघाडीच्या महारॅलीचे आयोजन दिल्लीतील रामलीला मैदानावर करण्यात आले आहेत. या महारॅलीला आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचे नेते उपस्थिती लावणार आहेत. याशिवाय आम आदमी पक्षाचे सरचिटणीस डॉ. संदीप पाठक यांनी म्हटले की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीच 31 मार्चच्या महारॅलीचा आदेश दिला आहे.

आणखी वाचा : 

Moscow Attack : मॉस्को हल्ल्यातील तीन आरोपींना कबुल केला गुन्हा, सैन्याने केलेल्या अत्याचाराचाही कोर्टात वाचला पाढा

ब्रिटनचे राजपुत्र विल्यम यांची पत्नी केट मिडलटनला mRNA Covid लसीकरणामुळे कॅन्सर ? काय आहे नेमकं कारण जाणून घ्या...

'हातात तलवार...भारताविरोधात घोषणा', खलिस्तान्यांकडून कॅनडा दौऱ्यावर आलेल्या भारतीय उच्चायुक्त संजय वर्मा यांचा विरोध