सार

मॉस्कोमध्ये झालेल्या हल्ल्यातील आरोपींना सोमवारी (25 मार्च) कोर्टासमोर हजर केले जाणार आहे. यादरम्यान, एका आरोपीचा कान कापल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसून येत आहे. रशियाच्या मीडियाने दावा केलाय की, सैन्याने टॉर्चरच्या दरम्यान आरोपीचा कान कापलाय.

Moscow Attack : मॉस्कोमधील शॉपिंग मॉल आणि संगीत स्थळ क्रोकस सिटी हॉलमध्ये 23 मार्चला दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्याच्या आरोपाखाली तीन ते चार संशयितांना कोर्टासमोर रविवारी (25 मार्च) हजर करण्यात आले. यावेळी आरोपींनी आपला गुन्हा कबूल केलाय. खरंतर, क्रोकस सिटी हॉलमध्ये झालेल्या हलल्यात 133 जणांचा मृत्यू झाला आहे.

संशयितांना घेतले होते ताब्यात
चार संशयितांसह अन्य सात जणांना मॉस्कोमधील हल्ल्यात समावेश असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट यांनी घेतली होती.

हल्ल्यातील आरोपी
दलेरदजॉन मिर्जोयेव, सैदाक्रमी राचबलीजोडा, मुखमदसोबिर फैजोव आणि शम्सिदीन फरीदुनी यांच्यावर बासमनी जिल्हा न्यायालयाच्या माध्यमातून औपचारिकरित्या एक दहशतवादी हल्ला केल्याचा आरोप लावण्यात आला होता. या घटनेत आरोपींना जन्मठेपेचे शिक्षा होऊ शकतो. तीन आरोपींनी आपला गुन्हा कबुल केला आहे.

रुग्णालयातून थेट कोर्टात हजर
आरोपींना रुग्णालयातून थेट कोर्टात हजर करण्यात आले. सुनावणीदरमायान डॉक्टर्सही कोर्टात उपस्थितीत होते. तीन अन्य जणांच्या चेहऱ्यावर जखमाही झाल्याचे दिसून आले. असे सांगितले जातेय की, त्यांचा चौकशीदरम्यान छळ करण्यात आला होता.

आरोपीच्या कानाला दुखापत
एसोसिएटेड प्रेसच्या रिपोर्ट्सनुसार, आरोपी रचाबलीजोडाच्या कानाला दुखापत झाल्याने पट्टी बांधली होती. त्याच अवस्थेत रचाबलीजोडाला कोर्टात हजर करण्यात आले होते. रशियाच्या रिपोर्ट्सनुसार, आरोपींची चौकशीची केली जात असताना चारपैकी एकाचा कान कापला होता. याशिवाय वृत्तसंस्था एएफपीच्या रिपोर्ट्सनुसार, चॅनल वनने म्हटलेय संशयितांना रशिया-बेलारूस सीमेच्या जवळ असलेल्या ब्रांस्क क्षेत्रातील खात्सुन गावातून ताब्यात घेतले होते.

आणखी वाचा : 

Moscow Firing : मॉस्को येथील दहशतवादी हल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केले दु:ख, म्हणाले....

Moscow Firing : मॉस्को येथील कॉन्सर्ट हॉलमध्ये झालेल्या गोळीबारात 60 जणांचा मृत्यू, दहशतवादी संघटना Islamic State ने घेतली हल्ल्याची जबाबदारी

मुलाने आपल्या 72 वर्षांच्या वडिलांसोबत या देशाच्या PM पंगा घेतला, डीपफेकद्वारे बदनामी करण्याचा प्रयत्न केला पण…