लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थिनीचा अपघातात मृत्यू

| Published : Mar 25 2024, 10:16 AM IST / Updated: Mar 25 2024, 10:19 AM IST

Accident

सार

लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये पीएचडी करणाऱ्या एका भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. खरंतर घटना विद्यार्थिनी घरी परत असताना अपघात झाल्याने घडली आहे.

London : लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये (London School of Economics) पीएचडी करणाऱ्या एका 33 वर्षीय भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. खरंतर, विद्यार्थिनी घरी सायकलवरून परत येत असताना तिचा अपघात झाला. चेइस्ता कोचर असे विद्यार्थिनीचे नाव आहे. चेइस्ताचा पती प्रशांत अपघातावेळी त्याच्या बाइकवर थोडा पुढे होता. अपघात झाल्यानंतर चेइस्ताचा जोरात आवाज ऐकल्याने तिच्या मदतीसाठी प्रशांत धावला. पोलीस अधिकारी आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. यानंतर चेइस्ताला रुग्णालयात दाखल केले असता तेथे तिचा मृत्यू झाला.

घरी परतताना चेइस्ताचा अपघात
घरी परत असताना चेइस्ताच्या सायकलचा अपघात एका लॉरीसोबत झाला. यानंतर चेइस्ताला रुग्णालयात उपचारासाठी नेले असता मृत्यू झाला. या घटनेत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

लेफ्टिनेंट जनरल यांची मुलगी
चेइस्ताचे वडील डॉ. एसपी कोचरलेफ्टिनेंट जनरल होते. ते सैन्यातील 23 व्या सिग्नल ऑफिसर-इन-चीफ होते. या घटनेनंतर चेइस्ताचा मोठा भाऊ राघव ब्रिटनेमध्ये आला आहे. याशिवाय प्रशांतसोबत चेइस्ताचे एका वर्षाआधीच लग्न झाले होते.

उत्तर प्रदेशात जन्मलेली चेइस्ता
चेइस्ता उत्तर प्रदेशातील बरेली येथे झाला होता. ती शिकण्यासाठी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात लंडनमध्ये आली होती. लंडनला येण्याआधी चेइस्ता पतीसोबत गुडगाव येथे राहत होती. चेइस्तानाने निती आयोगासाठी काम केले होते. तेथे चेइस्ताने व्यावहार विज्ञानासाठी एका युनिटची स्थापनाही केली होती. याशिवाय सेंटर फॉर सोशल अ‍ॅण्ड बिहेविअर चेंजमध्ये बिल अ‍ॅण्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशनसोबतही काम केले होते.

आणखी वाचा : 

Crime : मावळ येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरण, कोर्टाने आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Double Murder in UP : उत्तर प्रदेशातील बदाऊ येथे दुहेरी हत्याकांड, दोन मुलांची गळा चिरुन हत्या

इंदापूर येथील घटना : तुरुंगात झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी केली गोळ्या झाडून हत्या…