Earthquake : ताइवानमध्ये जाणवले 80 भूकंपाचे धक्के, भीतीपोटी नागरिकांनी घरातून काढला पळ

| Published : Apr 23 2024, 07:35 AM IST / Updated: Apr 23 2024, 07:37 AM IST

earthquake 3.jp

सार

Earthquake in Taiwan : ताइवानमध्ये सोमवारी मध्यरात्री भूकंपाचे जोरदार धक्के जाणावले गेले. 6.3 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांनी घाबरून घरातून पळ काढला. 

Earthquake in Taiwan : ताइवानमध्ये गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवत असल्याचे दिसून येत आहेत. सोमवारी (22 एप्रिल) मध्यरात्री ताइवानच्या काही ठिकाणी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले गेले. जवळजवळ 80 भूकंपाचे धक्के जाणवल्याचे बोलले जात आहे. यामुळे काही इमारती हलल्या गेल्या. पण अद्याप जीवतहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही.

6.3 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के
एक्सपर्ट्सनुसार, भूकंपाचा केंद्र ग्रामीण पूर्व काउंटी हुलिएन होता. भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल असल्याचे समोर आले आहे. गेल्या 3 एप्रिलालही 7.2 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत ताइवानमध्ये शेकडो भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.(Taiwan madhe bhukampache dhakke)

भूकंपाचे 80 धक्के जाणवले
सोमवारी मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत ताइवानमध्ये 80 भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय काही मोठ्या इमारती देखील हलल्या गेल्या. काही नागरिकांनी भूकंपामुळे इमारती हलत असल्याचेही पहाटे पाहिले.

आणखी वाचा : 

मालदीवमध्ये मोइज्जू विजयाच्या अगदी जवळ, पक्षाने संसदेच्या निवडणुकीत जिंकल्या सर्वाधिक जागा, भारतासोबत संबंध बिघडणार?

पाकिस्तानमध्ये पावसाचा हाहाकार, 87 जणांचा मृत्यू तर अनेक गावे पाण्याखाली